Viral Video: असा बॉस प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळावा! गेम खेळण्यासाठी CEO ने संपूर्ण ऑफिसलाच दिली सुट्टी; 4 लाख लाइक्सची अट ठेवली, पण मिळाले तब्बल 16 लाख!

CEO viral post on social media: एखादा नवीन व्हिडीओ गेम लॉन्च होणार म्हटले की गेमर्समध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते.
CEO viral post on social media
CEO viral post on social mediaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

एखादा नवीन व्हिडीओ गेम लॉन्च होणार म्हटले की गेमर्समध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. मात्र, याच गेमसाठी चक्क संपूर्ण ऑफिसला सुट्टी मिळाली तर? सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील एका कंपनीच्या CEO चा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, ही सुट्टी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कोणताही संप किंवा आंदोलन केले नाही, तर सोशल मीडियावरील लाइक्सचा आधार घेतला. लोकप्रिय गेम 'ग्रँड थेफ्ट ऑटो ६' अर्थात GTA 6 च्या लॉन्चच्या दिवशी सुट्टी मिळावी, अशी मागणी एका महिला कर्मचाऱ्याने थेट कंपनीच्या CEO कडे केली. त्यानंतर दोघांमध्ये झालेला संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

CEO ने ठेवली ४ लाख लाइक्सची अट; इंटरनेटने दाखवला कमाल

व्हायरल व्हिडीओमध्ये SERHANT. या अमेरिकन रिअल इस्टेट कंपनीतील एक महिला कर्मचारी CEO रायन सर्हेंट यांना एक मजेशीर प्रश्न विचारताना दिसते. GTA 6 गेम रिलीज होण्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी हवी असेल, तर सोशल मीडियावर किती लाइक्स मिळवावे लागतील, असे ती विचारते. सुरुवातीला CEO यांनी ५ लाख लाइक्सची अट सांगितली.

मात्र, कर्मचाऱ्याने ही संख्या कमी करण्याची विनंती केल्यानंतर अखेर ४ लाख लाइक्स मिळाल्यास ऑफिस बंद ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. एवढे लाइक्स मिळणे शक्य नसल्याचे कर्मचाऱ्याला वाटत होते. पण व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर इंटरनेटवरील यूजर्सनी या आव्हानाला अक्षरशः डोक्यावर घेतले. अवघ्या एका दिवसात व्हिडीओला १६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले. तसेच व्हिडीओने २ कोटींहून अधिक व्ह्यूजचा टप्पाही पार केला.

CEO ने पाळले वचन; कर्मचाऱ्यांना मिळाली अतिरिक्त सुट्टी

लाइक्सचा आकडा ठरलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने वाढल्यानंतर CEO रायन सर्हेंट यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागले. १८ नोव्हेंबर रोजी त्यांनी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून 'Grand Theft Auto Floating Holiday 2026' या नावाने अतिरिक्त सुट्टी जाहीर केली. या सुट्टीचा वापर कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी त्यांच्या सोयीनुसार करता येणार आहे. विशेष म्हणजे, गेम खेळण्यात रस नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही अतिरिक्त सुट्टी घेण्याची मुभा देण्यात आली. तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर GTA 6 येत असल्याने कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी देणे योग्य असल्याचे कंपनीने आपल्या संदेशातून स्पष्ट केले.

CEO viral post on social media
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

कोण आहेत रायन सर्हेंट?

रायन सर्हेंट हे अमेरिकेतील प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक आणि SERHANT. कंपनीचे संस्थापक व CEO आहेत. नेटफ्लिक्सवरील 'Owning Manhattan' या रिअॅलिटी शोमुळेही ते चर्चेत आले होते. या व्हिडीओमुळे त्यांच्या कंपनीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कंपनीच्या सोशल मीडिया टीमने दाखवलेल्या कल्पकतेमुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचेही सांगण्यात आले. एका साध्या विनोदी संवादाचे रूपांतर कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सुट्टीच्या घोषणेत झाले.

GTA 6 साठी सुट्टी देणारी SERHANT. एकमेव कंपनी नाही!

GTA 6 च्या लॉन्चचा उत्साह केवळ SERHANT. कंपनीपुरता मर्यादित राहिला नाही. अमेरिकेतील VisionTell या कंपनीचे CEO जॉन शुस्टर यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यासाठी १० हजार लाइक्सची अट ठेवली होती. मात्र, त्यांच्या व्हिडीओला तब्बल ३ लाख ७८ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले.

त्यानंतर कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना शुक्रवारची सुट्टी देण्याचे त्यांनी जाहीर केले. ब्रिटनमधील Anchor Offices या कंपनीने प्रत्येक १० हजार लाइक्समागे एक दिवसाची सुट्टी देण्याची घोषणा केली होती. या ऑफरमध्ये जास्तीत जास्त पाच दिवसांची मर्यादा ठेवण्यात आली होती. दुसरीकडे, Logitech या तंत्रज्ञान कंपनीनेही आपल्या जगभरातील सुमारे ७,३०० कर्मचाऱ्यांसाठी 'Logi Game Day' उपक्रम जाहीर केला. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना गेम खेळण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी किंवा त्यांच्या पसंतीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी घेण्याचा पर्याय देण्यात आला.

CEO viral post on social media
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

१३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर GTA 6 गेम लॉन्च

'Grand Theft Auto VI' हा बहुप्रतीक्षित गेम १९ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात लॉन्च झाला. हा गेम PlayStation 5 आणि Xbox Series X|S या गेमिंग कन्सोलवर उपलब्ध आहे. याआधी या मालिकेतील GTA 5 हा गेम २०१३ मध्ये रिलीज झाला होता. त्यामुळे पुढील भागासाठी चाहत्यांना तब्बल १३ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या दीर्घ प्रतीक्षेमुळे गेमच्या लॉन्चची चर्चा गेमिंग विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात झाली. आता या गेमच्या निमित्ताने कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुट्ट्यांचीही चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.