Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak

राणेंच्या आवाहनाला प्रतिसाद ; एका दिवसात 35 तक्रारी

दोषींवर कारवाईचा इशारा
Published on

पणजी : नगरनियोजन आणि शहर विकासमंत्री विश्‍वजीत राणे यांनी त्यांच्याकडील खात्यांमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून आपल्या खात्यांच्या संदर्भातील तक्रारी जनतेने थेट आपल्या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करताच त्याला मोठा प्रतिसाद लाभला असून पहिल्याच दिवशी तब्बल 35 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची छाननी करून संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात येतील. तसेच दोषींवर कठोर कारवाई करणार, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

Vishwajit Rane
आजचे गोव्यातील इंधनाचे दर जाणून घ्या

नगरनियोजन खात्याचा ताबा घेतल्यापासून मंत्री राणे यांनी या खात्यातील बेकायदा कृतीविरोधात धडक मोहीम राबवली असून, गेल्या सोमवारी राणे यांनी आपला ई-मेल आयडी देत यावर पुराव्यानिशी तक्रार देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी तब्बल 35 तक्रारी आल्या. या तक्रारी तपासल्या जात असून, संबंधित विभागाकडे पाठवल्या आहेत, असे राणे यांनी सांगितले.

तक्रारी समितीकडे वर्ग

राणे यांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पहिल्या दिवशीच 35 तक्रारी आल्या आहेत. यात जमीन रूपांतर, भू-रूपांतर, डोंगर कापणी, शेतांमध्ये मातीचा भराव टाकून जमीन तयार करणे, उतार कापणे, संरक्षित जागांवरील अतिक्रमण यांसारख्या नगरनियोजन खात्याच्या कायदा उल्लंघनाबरोबर वन खात्याशी संबंधित तक्रारी आहेत. या सर्व तक्रारी खात्याच्या समितीकडे वर्ग करण्यात आल्या असून, सर्वांवर कारवाई करणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.

Vishwajit Rane
'महामार्गावरील दारूच्या दुकानांचे परवाने रद्द न केल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार'

मी दिलेल्या ई-मेलवर पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने हा राज्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. जनतेने यापुढेही नगरनियोजन खात्यातील गैरकारभारांवर आळा आणण्यासाठी सहकार्य करावे आणि अशाच प्रकारे तक्रारी आल्यास त्याचा निश्चितच विचार केला जाईल.

- विश्वजीत राणे, नगरनियोजन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com