देशाच्या ऐक्यासाठी मुखर्जींचे योगदान अतुलनीय : तानावडे

भारतीय जनता पक्षातर्फे पणजीत आदरांजली कार्यक्रम
Sadanand Shet Tanavade
Sadanand Shet TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : देशाच्या ऐक्यासाठी स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या स्वप्नातील अखंड हिंदुस्थान हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.

Sadanand Shet Tanavade
राज्यात धुव्वाधार पाऊस ; ‘स्मार्ट सिटी’ पुन्हा पाण्याखाली

पणजी येथे भाजपच्या कार्यालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमहापौर संजू नाईक, गिरीश उस्कईकर, दामू नाईक, राजेश अगरवाल व सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.

Sadanand Shet Tanavade
'महामार्गावरील दारूच्या दुकानांचे परवाने रद्द न केल्यास उच्च न्यायालयात धाव घेणार'

तानावडे पुढे म्हणाले, की देशाच्या विकासात स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे योगदान मोठे होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेले कार्य आणि मार्गदर्शन आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अखंड हिंदुस्थान ही त्यांचीच मागणी आजही कायम आहे. देश विकासासाठी सर्वांनी एकत्रित येणे महत्वाचे आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हे पंतप्रधानांचे धोरणही मुखर्जी यांच्या धोरणाशी सुसंगत आहे.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की मुखर्जी यांचे कार्य भाजपसाठी महत्वाचे असून त्यांनी दिलेल्या योगदानामुळे संपूर्ण देश आज त्यांचे स्मरण करतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com