Santa Cruz Panchayat Fertiliser Scam: सांताक्रूझ खत घोटाळा प्रकरणी सरपंच, माजी सचिवांवर एफआयआरचे आदेश; पोलिसांना न्यायालयाचे निर्देश

Jennifer D'Oliveira FIR: तक्रारदार इनासियो परेरा आणि आदित्य परूळेकर यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने अंशतः मंजूर करत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
Jennifer D'Oliveira FIR
Santa Cruz Panchayat Fertiliser ScamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: सांताक्रूझ ग्रामपंचायतीच्या खत खरेदी व्यवहारात बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी सरपंच जेनिफर डी''ऑलिव्हेरा, माजी सचिव विधूर फडते आणि पंच सदस्य मंगेश गावको यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्याचे आदेश मेरशी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जुने गोवे पोलिस निरीक्षकांना दिले आहेत.

तक्रारदार इनासियो परेरा आणि आदित्य परूळेकर यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने अंशतः मंजूर करत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तक्रारदारांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, २८ मे २०२४ रोजी झालेल्या सांताक्रूझ ग्रामपंचायतीच्या बैठकीत शेतकऱ्यांना खत पुरवण्यासाठी दरपत्रके मागविण्याचा ठराव संमत झाला होता.

Jennifer D'Oliveira FIR
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

त्यानुसार २४ जून २०२४ रोजी ५० किलो खत पुरवठ्यासाठी सीलबंद दरपत्रके मागविणारी नोटीस जारी करण्यात आली. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, या निविदेसाठी केवळ म्हापसा येथील ''केडकर मॅन्युअर'' आणि पणजी येथील ''भोंसुले ट्रेडर्स'' या दोनच संस्थांची दरपत्रके प्राप्त झाली होती.

दरपत्रके बनावट

२ जुलै २०२४ रोजीच्या पंचायत बैठकीत कोणतेही सीलबंद लिफाफे उघडले नाहीत, तसेच प्रोसिडिंग्ज बुकमध्ये अशा कोणत्याही बैठकीची नोंद नाही. बैठकीत लिफाफे न उघडताच बेकायदेशीररित्या तुलनात्मक तक्ता तयार करून ''भोंसुले ट्रेडर्स''चे दरपत्रक मंजूर केल्याचे दाखवण्यात आले. सरपंच जेनिफर डी''ऑलिव्हेरा आणि माजी सचिव विधूर फडते यांनी संगनमताने ही दोन्ही दरपत्रके बनावट तयार केली होती. दोन्ही दरपत्रकांचा नमुना, मांडणी, लेटरहेड, तारीख आणि आवक नोंद एकसारखीच असून त्यात हिशोबाच्या चुका आहेत. त्यावर कोणताही शिक्का किंवा स्वाक्षरी नाही, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

Jennifer D'Oliveira FIR
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.