Drug Case: 11 कोटींच्या ड्रग्सप्रकरणात संशयिताला जामीन; 24 तासांनंतर कोर्टात हजर केल्याने पोलिसांना दणका

Court Bail Order: मली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) ११.०७ कोटी रुपयांचा एलएसडी द्रव आणि गांजा जप्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित मुहम्मद समीर याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Court Bail Order
Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) ११.०७ कोटी रुपयांचा एलएसडी द्रव आणि गांजा जप्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित मुहम्मद समीर याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

घटनेनुसार अनिवार्य असलेल्या २४ तासांच्या मुदतीनंतर संशयिताला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्याने त्याच्या घटनेच्या कलम २१ आणि २२(२) मधील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

Court Bail Order
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

‘एएनसी’च्या पथकाने २१ एप्रिल २०२५ रोजी शिवोली येथे छापा टाकला होता. या प्रकरणात मुहम्मद समीर हा संशयित असून तो मूळचा केरळ येथील रहिवासी आणि गोव्यात टुरिस्ट गाईड म्हणून काम करत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.