Mopa International Airport  Dainik Gomantak
गोवा

'मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाचे सर्व आराखडे सादर करा'

मोपा पंचक्रोशी पीडित जनसंघटनेतर्फे पंचायतींना निवेदन

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्याचे सर्व आराखडे पंचायतींकडे उपलब्ध असायला हवेत. पण स्थानिकांचा असा दावा आहे की, हे आराखडे पंचायतींकडे उपलब्ध नाहीत. हे आराखडे का उपलब्ध नाहीत? याचे उत्तर ग्रामपंचायतीने द्यावे, अशा मागणीचे निवेदन मोपा पंचक्रोशी पीडित जनसंघटनेने पंचक्रोशीतील सर्व पंचायतींना सादर केले.

मोपा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढू लागला आहे. हे आराखडे पंचायतीकडे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध नसतील तर या प्रकल्पाचे काम कंत्राटदार उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे करत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या प्रकल्पाला आता स्थानिक मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवत आहेत. मोपा लिंक रोडचे काम स्थगित ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला दिले होते; पण या नोटिसीला केराची टोपली दाखवून कंत्राटदाराने रस्त्याचे काम वेगाने सुरू केले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

अटींची पूर्तता करण्याची मागणी

या संघटनेने वारखंड, चांदेल, कासारवर्णे, पोरस्कडे आणि मोपा या पंचायतींना संघटनेने निवेदन दिले. मोपा पंचक्रोशी पीडित जनसंघटनेने निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोपा विमानतळाला हिरवा कंदील देताना काही अटी घातल्या होत्या या अटीत असे नमूद केले होते, की स्थानिक ग्रामपंचायतींकडे सर्व आराखडे असायला हवेत. त्याचप्रमाणे या प्रकल्पाचे काम करताना स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेणे गरजेचे होते. या प्रकल्प परिसरात येणाऱ्या कामांची माहिती स्थानिक पंचायतीला असायला हवी, असा दावा मोपा विमानतळ पंचक्रोशी संघटनेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT