साळ: डिचोली तालुक्यातील साळवासीयांना उत्सवाचा शिरोमणी गडेत्सवाचे वेध लागले आहेत. तीन रात्री होणाऱ्या या प्रसिद्ध गडेत्सवाला अवघेच दिवस शिल्लक राहिले असून संपूर्ण गाव उत्सवाच्या तयारीत मग्न झाला आहे. कोरोनाचे सावट काही अंशी दूर झाल्याने भाविकांच्या गर्दीत वाढ होणार असल्याने यंदाचा गडेत्सव उत्साहात पार पडावा, यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
हा उत्सव 18 ते 20 मार्च या कालावधीत होणार आहे. याविषयी देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली भूमिका मंदिराच्या सभामंडपात एक बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
देवस्थान समितीचे अध्यक्ष राऊत, सचिव विशाल परब व इतर सदस्य, सरपंच व पंच यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळे, संस्था, समाजसेवक व ग्रामस्थांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. ग्रामस्थांनी अंगणात माडाच्या झावळ्यांनी (चुडते) पारंपरिक मंडप उभारण्यास प्रारंभ केला आहे. मंदिर परिसर सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या उत्सवासाठी राज्यभरातून भाविक येतात.
महिलांना बसण्यासाठी होळीच्या परिसरात भव्य मंडप उभारण्यात येणार आहे, असे राऊत, परब यांनी सांगितले. गडेत्सव ज्या क्षेत्रात साजरा होतो त्या भागात उत्सवादरम्यान वीज खंडित होऊ नये म्हणून तिन्ही रात्री वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पंढरीनाथ राऊत, यशवंत गाडगीळ, सदा राऊत, नीलेश परब, प्रकाश राऊत, देव राऊत, सगुण राऊत, सुरेश परब, दीपक राऊत, यशवंत राऊत, उमेश राऊत, विजयानंद राऊत, मुकुंद परब, संजय परब, शैलेश राऊत, विश्वनाथ परब, दत्ताराम परब, गुरुनाथ राऊत, अजय राऊत, रवी राऊत, रमेश परब, वासुदेव परब, सचिन राऊत, उत्तम राऊत, शांबा घुरे, पांडुरंग परब, सुरेश राऊत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.