काणकोण येथील शाळा परिसरात तब्बल 21 मद्यालये

काणकोणात काही मद्यालयांना 1958 मध्ये परवाना देण्यात आला होता
Goa School
Goa School Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोण तालुक्यातील शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिघात मद्यालयांची संख्या किती आहे, याचा अहवाल अबकारी कार्यालयाने सर्वेक्षण करून काणकोणच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाला निर्देश देऊन अहवाल सादर करण्याची सूचना केली होती, असे अबकारी खात्याचे निरीक्षक शेखर देसाई यांनी सांगितले. काणकोणात अशी एकवीस मद्यालये असल्याची माहिती मिळाली आहे.

Goa School
मतदान पेटीशी छेडछाडीची आरजीची तक्रार

काणकोणात काही मद्यालयांना 1958 मध्ये परवाना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर काही ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. प्राप्त माहितीनुसार आगोंद किनारी भाग, पैंगीण बाजार, माशे, भाटपाल, पाळोळे या भागांत शैक्षणिक संस्थांजवळ मद्यालये आहेत. त्यामुळे या मद्यालयांवर कारवाई झाल्यास त्यांना शंभर मीटर परिघ क्षेत्राबाहेर स्थलांतर करावे लागणार आहे. शाळांजवळ मद्यालये असल्यामुळे काणकोणमधील विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com