सडयें-शिवोलीत घरोनघर् प्रचारात गुंतलेले विनोद पालयेंकर आपल्या समर्थकांसमवेत : संतोष गोवेकर. Dainik Gomantak
गोवा

शिवोलीतून अपक्ष म्हणून मलाच पुन्हा पसंती : पालयेंकर

राष्ट्रीय पक्षांचा माझ्यावर परिणाम होणार नाही

दैनिक गोमन्तक

गोवा: मागच्या विधानसभेत शिवोलीचे प्रतिनिधीत्व करण्याची मला संधी लाभल्याने आमदार तसेच मंत्री या नात्याने मी शिवोलीत अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. बहुचर्चीत म्हादईच्या प्रश्नांवरून जीवाची पर्वा न करतां मी शेवटपर्यंत लढा दिलेला आहे. (Statement of Vinod Palayenkar regarding Goa Assembly Election)

पाणी -वीज समस्येकडे जातीने लक्ष घातले असून तिळारीचा महत्वांकांक्षी प्रकल्प आणण्यात यश मिळवीले आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी Goa Assembly Election पुन्हां एकदां मतदारांकडे जात असतांना आपल्याला कोणतीही अडचण भासत नसल्याचे शिवोलीचे माजी आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री विनोद पालयेंकर Vinod Palyekar यांनी दै. गोमंतकशी बोलतांना सांगितले. गत विधानसभा निवडणुकीत प्रस्थापीत राजकारण्यांचा दोन हजारच्या आसपास मतांनी पराभव करीत मी विजय संपादन केला होता

यंदाही विजयाची तीच परंपरा राखण्यात मी यशस्वी होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मागच्या निवडणुकीत गोवा फॉर्वार्डच्या Goa Forward तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पालयेंकर यांना यंदा त्यांच्याच पक्षाकडून तिकिट नाकारण्यात आल्याने त्यांनी सरतेशेवटी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा स्थानिक मतदारांचा अधिक पाठींबा मिळत असल्याचे विजयाचा मार्ग सुकर असल्याचे पालयेंकर यांनी सांगितले. माजी मंत्री मायकल लोबो यांच्या पत्नी दिलायला लोबो तसेच माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांच्या राष्ट्रीय पक्षांचा आपल्यावर बिल्कुल फरक पडणार नसल्याचे सांगतानाच यंदाच्या खेपेस स्थानिक मतदारांचा अपक्ष म्हणून आपल्यालाच कौल जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोवा फॉर्वार्डचे उमेदवार अथवा कॉग्रेस-फॉर्वार्ड युतीचे उमेदवार म्हणून लोकांसमोर गेलो असतो तर लोकांनी निश्चितच नाकारले असते परंतु अपक्ष म्हणून घरांघरांतून आपल्याला भरघोस पाठिंबा मिळत आहे त्यामुळे शिवोलीत पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर आपण पुन्हां निवडून येणार असल्याचे पालयेंकर यांनी शेवटी सांगितले.....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT