Sankalp Amonkar
Sankalp AmonkarDainik gomantak

संकल्प आमोणकरांनी भरला 'या' मतदारसंघातून उमेदवारी अर्ज

गेल्या दोन निवडणुकीत अल्पशा मतांनी मी पराभूत झालो तरीही डगमगलो नाही
Published on

वास्को : काॅंग्रेस पक्षाचे मुरगाव मतदार संघातील उमेदवार संकल्प आमोणकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकारी दत्तराज गावस देसाई यांच्या समोर सादर केला. निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करुन आमोणकर यांनी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या सोबत पत्नी श्रद्धा, निवडणूक एजंट शरद (नितीन) चोपडेकर उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमोणकर म्हणाले आपला विजय हमखास आहे. माझे कार्यकर्ते रक्ताचे पाणी करून माझ्या विजयासाठी अथक परिश्रम घेत आहेत. आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन मतदारांची भेट घेतली आहे. गेल्या दोन निवडणुकीत (Election) अल्पशा मतांनी मी पराभूत झालो तरीही डगमगलो नाही. पुन्हा एकदा माझ्या प्रेमळ पाठीराख्यांच्या जोरावर मी निवडणूक आखाड्यात उतरलो असून या खेपेस मला विजयाची पूर्ण खात्री आहे असे आमोणकर म्हणाले.

Sankalp Amonkar
फातोर्डातील बीएलओंना तत्काळ निलंबित करण्याची गोवा फॉरवर्डची मागणी

भरघोस मतांनी विजयी होण्याचे संकेत आपल्याला मिळत असून मागील दोन निवडणुकीत आपल्या बरोबर नसलेले मतदार याखेपेस पाठीशी आहे त्यामुळेच माझ्या विजयाची तुतारी आत्तापासून वाजायला सुरू झाली आहे.

मुरगावमध्ये (Mormugao) मतदारांकडे आपण जोडलेली नाळ कायम ठेवलेली आहे.लाॅकडाऊन काळातील आपण जनतेसाठी केलेली सेवा मतदारांना आठवणीत आहे.मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी जेंव्हा जेंव्हा मुरगावमध्ये अधर्म माजविला तेंव्हा तेंव्हा आपण जनतेच्या मदतीला धावून गेलो हे मतदार विसरत नाही, आणि त्यामुळेच माझ्या पारड्यात ऐतिहासिक मते मतदार टाकतील असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.

Sankalp Amonkar
उच्च न्यायालयाची मोले हॉटमिक्सिंग प्लांटला नोटीस

मतदारांनी मला एकदा आमदारकीची (MLA) संधी दिल्यास न भूतो न भविष्यती अशी सेवा मी मतदारांची करणार यात तीळमात्र शंका नाही. संधी मिळाल्याशिवाय मुरगावतील जनतेसाठी काय काम करु शकतो हे मी कसे दाखवू शकतो असा सवाल आमोणकर यांनी उपस्थित करून एकदा संधी द्यावी, नंतर पाहा तुमच्या संकल्प आमोणकरने तुमच्यासाठी कोणता संकल्प करून ठेवला आहे हे दिसून येईल असे आमोणकर म्हणाले.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे तसेच कोविड मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन आपला प्रचार मुरगाव मतदार संघात चालला आहे.सर्व थरांतून प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com