CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Bridge Audits: 30 वर्षे जुन्या पुलांचे होणार ऑडिट! CM सावंतांचे सूतोवाच; वर्षभरात धारगळ, कळणे नदीवरही साकारणार पूल

Pramod Sawant statement: या दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी स्थानिक ग्रामपंचायत व लोकांनी सहकार्य करावे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: तीस वर्षांपेक्षा जास्त काळ उलटलेल्या राज्यातील सर्व पुलांचे ऑडिट करण्यात येत असून आवश्यकतेनुसार त्याजागी दुरुस्ती किंवा नवीन पुलांची बांधणी करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपूल बांधकामाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी चांदेल- हसापूर पुलाचे संगणकाची कळ दाबून उद्‍घाटन केले. यावेळी व्यासपीठावर धारगळचे सरपंच अर्जुन कानोळकर, पंचायत सदस्य भूषण नाईक, हसापूरचे सरपंच बाळा शेटकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

धारगळ येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ चे बांधकाम करताना उड्डाणपूल होणार होता. पण काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी केलेल्या विरोधामुळे हा पूल रद्द झाला व त्यावर आता कोटी रुपये जास्त खर्च करून हा उड्डाणपूल बांधावा लागत आहे. तर चांदेल - हसापूर येथे खर्च करून पूल बांधण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी स्थानिक ग्रामपंचायत व लोकांनी सहकार्य करावे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या ठिकाणी सातत्याने अपघात होऊ लागले व उड्डाणपुलाची मागणी होत असल्याने मी वैयक्तिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी या उड्डाणपूलास मान्यता दिली. ४५ कोटी ३१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा उड्डाणपूल एक किमी अंतराचा असून या पुलाचे कंत्राट मेसर्स कन्हैया लाल अग्रवाल या कंपनीने घेतले आहे. या पुलासाठी प्रत्येकी ३२ मीटरचे चार खांब, तसेच दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडची ही सोय असेल. येत्या नोव्हेंबरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार आहे. प्रधान अभियंते उत्तम पार्सेकर, सरपंच सुबोध महाले यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन देवानंद गावडे यांनी केले.

पुलाला विरोध करणारे अपघातांना कारणीभूत!

मुख्यमंत्री म्हणाले, की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर धारगळ येथे उड्डाणपुलाची तरतूद होती. पण काहीजणांनी स्वत:च्या फायद्यासाठी या पुलास विरोध केला. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात झाले. त्यात बरेचजण जायबंदी झाले, तर काहींना जीवही गमवावा लागला. या उड्डाण पुलास विरोध करणारेच या अपघातांना जबाबदार आहेत. अशाच प्रकारे राज्यात काही लोक स्वार्थासाठी विकासकामांत अडथळे आणत असून जनतेने त्यांना थारा देऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: धारगळ दोन खांब ते आरोबा हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

"ही राजकीय नाही, गोवा वाचवण्‍याची चळवळ"! निवृत्त न्‍या. फर्दिन रिबेलोंची हाक; वाचा घोषणापत्र आणि महत्वाचे मुद्दे..

Goa Road Projects: गोव्‍यासाठी 7076 कोटींच्‍या रस्त्यांचा प्रस्‍ताव गडकरींना सादर! मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa AAP:‘आप’ला गोव्यात लागलेल्या गळतीचे कारण दिल्लीतील नेतृत्व! कार्यकर्त्यांमध्ये बळावली भावना; पक्षाची वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त

SCROLL FOR NEXT