Manish Jadhav
'OSH India 2025' (ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ) च्या उद्घाटन समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबईत हजेरी लावली.
मुंबईतील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत त्यांनी प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.
त्यांनी मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन विशेष पूजा केली.
मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पासमोर हात जोडून, देवाचे आशीर्वाद मागितले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वांसाठी शांतता, समृद्धी आणि आनंदाची प्रार्थना केली.
आपल्या सार्वजनिक जीवनात व्यस्त असतानाही मुख्यमंत्र्यांनी धार्मिक श्रद्धा आणि शांततेच्या प्रार्थनेला महत्त्व दिल्याचे या भेटीतून दिसून आले.
मुख्यमंत्र्यांचा मुंबईतील दौरा व्यावसायिक आणि धार्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरला.