होळीची तयारी करतानाच काळाचा घाला! पेटता खांब कोसळून 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मेणकुरे गावात पसरली शोककळा

Bicholim Accident News: मेणकुरे परिसरात परंपरेनुसार होळीचा खांब उभा करण्याचे काम ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर सुरु होते.
Bicholim Death News
Bicholim DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: डिचोली तालुक्यातील मेणकुरे येथे होळीच्या उत्सवासाठी उभारण्यात येत असलेला लाकडी खांब अंगावर कोसळून झालेल्या अपघातात एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले. होळीची पूर्वतयारी सुरु असताना ही दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, मेणकुरे परिसरात परंपरेनुसार होळीचा खांब उभा करण्याचे काम ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर सुरु होते. मात्र, हा खांब उभारताना अचानक त्याचा समतोल बिघडला आणि अवजड लाकडी खांब थेट खाली उभ्या असलेल्या या 40 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर कोसळला. हा आघात इतका भीषण होता की, संबंधित व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली. उपस्थित ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत या व्यक्तीला बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ बांबोळी येथील गोवा (Goa) वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

Bicholim Death News
Bicholim: चित्रविचित्र मुखवटे, पिचकाऱ्या अन्‌ रंगांची आरास; शिमग्याच्या साहित्याने डिचोली बाजार फुलला, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अंतर्गत दुखापत गंभीर असल्याने अखेर या व्यक्तीची प्राणज्योत मालवली. स्थानिक प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असून उत्सवाच्या काळात अशा प्रकारच्या उंच रचना उभारताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

40 वर्षीय कर्त्या व्यक्तीचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने पीडित कुटुंबावर आभाळ कोसळले असून संपूर्ण मेणकुरे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस (Police) याप्रकरणी अधिक तपास करत असून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले होते का, याचीही पडताळणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

GIM Student Attack
15 lakh gold jewellery theft in Goa
Kapileshwari Kavale Pond Fish Death
Sporting Club Goa Charity Cup
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com