"गोव्यात येऊन समाधानी आहात का"? UAE मधून परतणाऱ्या गोमंतकीयाने Social Media वर विचारला प्रश्न; युजर्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

Goa Reddit Social Media Viral Post: ‘घरी परतावे की परदेशातच स्थिर व्हावे’ हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. याच पार्श्वभूमीवर संबंधित यूजरने कायमचे गोव्यात परतलेल्या नागरिकांना थेट प्रश्न विचारला आहे.
Goa career vs lifestyle decision
Goa career vs lifestyle decisionDainik Gomantak
Published on
Updated on

रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका यूजरने गोव्यात कायमस्वरूपी परत येऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त करताच त्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. तब्बल दहा वर्षे घरापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा गोव्यात स्थायिक होण्याचा विचार तो गंभीरपणे करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाबाबत तो संभ्रमात असून, आधीच परतलेल्या गोमंतकीयांकडून प्रामाणिक मत जाणून घेण्याची त्याची इच्छा आहे.

या पोस्टमध्ये तो लिहितो, “नमस्कार गोवावासीयांनो! मी १० वर्षे दूर राहिल्यानंतर माझा स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी घरी परतण्याचा विचार केला आहे. मला भारतातील एका महानगरात शिक्षण घेण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली, तसेच काही काळ युरोपमध्येही राहण्याची संधी मिळाली.

तीन वर्षांपूर्वी कामानिमित्त युएईला गेलो. येथे जीवन व्यवस्थित आहे, चांगली बचत झाली आहे; मात्र करिअरमध्ये वाढ थांबली आहे आणि सामाजिक आयुष्य खूपच मर्यादित झाले आहे.” गोव्यातील मर्यादित रोजगार संधींमुळे अनेक तरुण-तरुणी उच्च शिक्षण किंवा चांगल्या नोकरीच्या शोधात देशातील मोठ्या शहरांकडे किंवा परदेशात स्थलांतर करतात.

Goa career vs lifestyle decision
Goa Opinion: 'साळावली' धरणाला असाच विरोध झाला असता तर संपूर्ण दक्षिण गोव्याची गत काय झाली असती..?

त्यामुळे ‘घरी परतावे की परदेशातच स्थिर व्हावे’ हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. याच पार्श्वभूमीवर संबंधित यूजरने कायमचे गोव्यात परतलेल्या नागरिकांना थेट प्रश्न विचारला आहे – “मागे वळून पाहताना तुम्ही तुमच्या निर्णयावर समाधानी आहात का? की काही प्रमाणात पश्चात्ताप वाटतो?” या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Goa career vs lifestyle decision
Viral Post: "मी गोव्यात कुठे राहू"? Reddit वर रंगली धमाल चर्चा; नेटकरी म्हणाले, 'घरीच रहा आणि पैसे वाचव..'

काहींनी गोव्यातील शांत जीवनशैली, कुटुंबासोबत घालवता येणारा वेळ आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे स्वातंत्र्य यांचा सकारात्मक उल्लेख केला. तर काहींनी व्यवसायातील स्पर्धा, वाढते खर्च, मर्यादित बाजारपेठ आणि प्रशासकीय अडचणींचा अनुभव शेअर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com