Tragic Death: चिंचणी हादरले! भीषण आगीत अंथरुणाला खिळलेल्या वृद्धेचा होरपळून मृत्यू; परिसरात हळहळ

Chinchinim House Fire Woman Death: चिंचणी येथे सोमवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत एका ७० वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
House fire in Chinchinim Goa | Woman dies in Goa fire incident
House fire in Chinchinim Goa | Woman dies in Goa fire incidentDainik Gomantak
Published on
Updated on

चिंचणी येथे सोमवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत एका ७० वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही महिला अंथरुणाला खिळलेली असल्याने तिला वेळेत बाहेर काढता आले नाही, अशी माहिती कुंकळ्ळी येथील पोलीस निरीक्षक दियोगो ग्रासियास यांनी दिली.

मृत महिला आणि तिचा भाऊ हे दोघे भाड्याच्या खोलीत राहत होते. रात्री अचानक आग लागल्याने परिसरात घबराट पसरली. आग वेगाने पसरल्यामुळे घर पूर्णपणे जळून खाक झाले. महिलेचा भाऊ स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झाला; मात्र त्यालाही दुखापती झाल्या असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

House fire in Chinchinim Goa | Woman dies in Goa fire incident
Tragic Death: दुर्दैवी! भिंत कोसळून 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू; कुंकळ्ळीतील दु:खद घटना

आग लागल्याची माहिती मिळताच कुंकळ्ळी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले; परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. घरातील साहित्य जळून गेले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

House fire in Chinchinim Goa | Woman dies in Goa fire incident
Tragic Death: 'गडबड केली आणि जीव गमावला'! धावत्या रेल्वेतून उतरताना पडून अज्ञाताचा मृत्यू; करमळी स्टेशनवरील धक्कादायक घटना

घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलवला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com