CM Pramod Sawant: नोकरीसाठी पहिली संधी अनाथ मुलांना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा

Goa Cabinet Decision: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती योजनेत मानवतावादी दृष्टिकोनातून बदल करण्याची घोषणा केली.

गोवा मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक पार पडली, ज्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी आणि राज्यातील उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी तीन मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती योजनेत मानवतावादी दृष्टिकोनातून बदल करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, "ज्या मुलांचे पालक निधन पावले आहेत आणि जी मुले अनाथ झाली आहेत, त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देताना सर्वात आधी प्राधान्य दिले पाहिजे." अशा अनाथ मुलांना शक्य तितक्या लवकर नुकसान भरपाई आणि नियुक्ती प्रदान करण्यात यावी, यासाठी योजनेत बदल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Political Reservation
Pramod Sawant Nitin Nabin Meeting
Goa Crop Loss Compensation
Goa Warkari Tradition History Before Portuguese
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com