Computer Based Exams  Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Staff Selection Commission Goa: कर्मचारी निवड आयोगाने यापूर्वीच काम सुरू केले आहे. २०२३ मध्ये ३३ रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली होती आणि संगणक आधारित भरती परीक्षांद्वारे उमेदवारांची निवड केली होती. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संबंधित विभागांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Staff Selection Commission Recruitment Process for 33 Vacancies

पणजी: कर्मचारी निवड आयोगाने यापूर्वीच काम सुरू केले आहे. २०२३ मध्ये ३३ रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली होती आणि संगणक आधारित भरती परीक्षांद्वारे उमेदवारांची निवड केली होती. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संबंधित विभागांनी केली आहे.

या पदांसाठी आयोगाकडे एकूण २,०५९ अर्ज आले होते. जाहिरात केलेल्या पदांमध्ये नेटवर्क अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, साहाय्यक उपनिरीक्षक, तंत्रज्ञ यांचा समावेश होता.

२०२४ मध्ये आयोगाने शिक्षण खात्यातील प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक पदासाठी ३६ रिक्त पदांसाठी जाहिरात जारी केली होती. निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षण विभागाने आधीच नियुक्तीची ऑफर जारी केली आहे.

यावर्षी आजपर्यंत जाहिरात केलेल्या ३६ रिक्त पदांसाठी एकूण १,५४० अर्ज आले होते. आयोगाने कामकाज सुरू केल्यापासून आयोगाने जाहिरात केलेल्या ६९ रिक्त जागांसाठी उमेदवार निवडीसाठी ११ संगणक भरती परीक्षा घेतल्या आहेत.

नोकर भरती आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू (आयएएस), तर सदस्य दौलत हवालदार (निवृत्त आयएएस) आणि मिनिनो डिसोझा (निवृत्त आयएएस) हे आहेत. तसेच ॲडमिनिस्‍ट्रेटीव्‍ह विभागात शशांत ठाकूर- सचिव, अमलीतेश शिरवईकर, दीप्‍ती गावकर यांचा समावेश आहे.

२०२३ मध्ये नियमावली

सरकारी नोकऱ्यांच्या निवड प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी गोवा कर्मचारी निवड आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. विविध खात्यांतील ‘क’ गटातील रिक्त पदे एकत्रित करून थेट आयोगामार्फत परीक्षा घेऊन निवड केलेल्या उमेदवारांची शिफारस करण्यात येते.

आयोगाने भरती प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी २०२३ रोजी नियमावली तयार केली. सर्व खात्यांनी १ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात रिक्त असलेल्या पदांची माहिती आयोगाला दिल्यावर त्याची छाननी करून आयोग जाहिरात देऊन भरती प्रक्रिया सुरू करते.

अशी होत निवड प्रक्रिया

कर्मचारी निवड आयोग शैक्षणिक, साहित्य आणि इतर क्षेत्रातील विविध तज्ज्ञांना पात्रता आणि त्यांना नियुक्त केलेल्या विषयांवर आधारित प्रश्‍नपेढी (क्वेशन बँक) तयार करण्यास सांगतो.

आवश्यकतेनुसार पदाची जाहिरात आयोग करतो आणि विविध खात्यांची सामान्य पदे असल्यास ती एकत्रित केली जातात. जाहिरातीसोबतच एक अभ्यासक्रम आणि परीक्षेची योजनाही प्रसिद्ध केली जाते.

त्यानंतर संगणक आधारित चाचणी (सीबीटी) परीक्षा घेतली जाते, ज्यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, तर्क क्षमता, कोकणी भाषेची चाचणी आणि पदाची विषय विशिष्ट चाचणीचा समावेश असतो.

...अशी असेल पद्धत

भरतीसाठी संगणकावर ऑनलाईन परीक्षा घेण्‍यात येईल. उमेदवाराने ही परीक्षा दिल्यानंतर २४ तासांच्या आत निकाल प्रसिद्ध केला जाईल.

दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी उमेदवाराने दिलेल्या उत्तरांसह प्रश्‍नपत्रिका उपलब्ध केली जाईल.

प्रश्नपत्रिकेसंदर्भात काही तक्रारी असल्यास आयोगाने तीन दिवसांची मुदत दिली आहे. परीक्षेनंतर चौथ्या दिवशी तक्रारी आल्‍यास त्या तज्‍ज्ञांना त्यांच्या टिप्पण्यांसाठी पाठवल्या जातील.

४. टिप्पण्या प्राप्त झाल्यानंतर, आयोग तक्रारीवर विचार करेल आणि चाचणीच्या ८ व्या दिवशी अंतिम निकाल घोषित करण्‍यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs South Africa: 5 सामन्यांत 2 शतके, 1 द्विशतक...! श्रेयस अय्यरची जागा घेणार विराटचा पठ्ठ्या? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पाडणार छाप

Hurricane Melissa Video: 'हरीकेन हंटर्स'ची धाडसी मोहीम! मेलिसा चक्रीवादळाच्या केंद्रातून केले जीवघेणे उड्डाण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

SCROLL FOR NEXT