Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Ramesh Tawadkar : 'लोकांची दिशाभूल केली', सभापती तवडकर ठोकणार 'या' दोन नेत्यांवर मानहानीचा दावा

संबंधित लाकूड वनखात्याकडून लिलाव पद्धतीने खरेदी केले : तवडकर

गोमन्तक डिजिटल टीम

संबंधित लाकूड वनखात्याकडून लिलाव पद्धतीने खरेदी केले आहे. ते लाकूड श्रमधाम घरासाठी वापरण्यात येणार असून ते चिरण्याची प्रक्रिया चालू आहे. कॉग्रेसचे जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्ड पक्षाचे विकास भगत धाधांत खोटे बोलत असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान या संदर्भात दोघांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

वनखात्याचे लाकूड लिलाव पद्धतीने आहे त्याच जागेवरून विकत घेण्यात आले आहे. ते लाकूड श्रमधाम घरासाठी वापरण्यात येणार असून ते चिरण्याची प्रक्रिया सद्या चालू आहे.

मात्र, कॉग्रेसचे जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्ड पक्षाचे विकास भगत लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप तवडकर यांनी केला आहे. या लाकडा संदर्भात वनखात्यात पैसे भरणा केले असून त्याची पोचपावती असल्याचे सभापती तवडकर यांनी सांगितले.

काणकोणच्या वनांत उन्मळून पडलेल्या झाडांचा वनखात्याने आहे त्या स्थितीत लिलाव केला. श्रमधाम योजनेखाली बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी इमारती लाकडाची गरज असल्याने वनखात्याकडून ती झाडे विकत घेण्यात आली. ती कापून त्याचे ओंडके करून त्यांची वाहतूक करण्यात आली.

मात्र, हे नेते शासकीय सुतारकाम केंद्रातील लाकडांच्या ओंडक्याचे ढीग व्हिडिओवर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात दोघांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT