Goa Government | Souza Lobo Restaurant
Goa Government | Souza Lobo Restaurant Dainik Gomantak
गोवा

Souza Lobo Restaurant Attack case : गोवा सोडण्याच्या अटीवर गजेंद्र सिंगला जामीन

दैनिक गोमन्तक डिजिटल

उमतावाडा - कळंगुट येथील सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोडप्रकरणी अटक झालेल्या संशयित गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू याला दीड वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन दिला. त्याची सुटका होताच 48 तासात त्याने गोवा सोडून जावे व खटल्यावरील सुनावणीवेळीच गोव्यात यावे, अशी अट न्यायालयाने घातली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशात संशयित छोटू याला ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी तसेच तत्सम रकमेचा एक हमीदार सादर करावा. सुटकेनंतर त्वरित गोवा सोडून जावे. त्याने तपास अधिकाऱ्याकडे त्याचा पत्ता व मोबाईल क्रमांक सादर करावा. त्याच्याविरुद्धच्या खटल्यावेळीच त्याला गोव्यात प्रवेश असेल.

सुनावणीसाठी तो आदल्या दिवशी येऊ शकतो व सुनावणी संपल्यानंतर 24 तासात त्याने गोव्यातून निघून जावे. अटींचे उल्लंघन झाल्यास पोलिसांनी त्याचा जामीन अर्ज रद्द करण्यासाठी अर्ज करावा, असे आदेशात म्हटले आहे.

संशयित गजेंद्र सिंग याच्यासह सुमारे ५० लोकांच्या जमावाने सौझा लोबो रेस्टॉरंटवर हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी दगडफेक तसेच लोखंडी व लाकडी दांडा तसेच लोखंडी पाईप्सचा वापर करून रेस्टॉरंटची तोडफोड करण्यात आली होती. यात रेस्टॉरंटचे तीन कर्मचारी जखमी झाले होते. कळंगुट पोलिसांनी या संशयितासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पाच संशयित अजूनही फरारी

पोलिसांनी 25 जणांविरुद्ध आरोपपत्र सादर केले आहे त्यातील ५ जण अजूनही फरारी आहेत. 19 जणांना यापूर्वीच जामीन मिळाला होता तर संशयित छोटू याने सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयात केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. त्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंतही मजल मारली होती मात्र या घटनेतील काही संशयित फरारी असल्याने त्याला जामीन नाकारण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT