Mumbai-Goa Vande Bharat: खुशखबर! वंदे भारत ट्रेन लवकरच मुंबई-गोवा महामार्गावर सुरू होणार, आज चाचणी

चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
Mumbai-Goa Vande Bharat
Mumbai-Goa Vande BharatDainik Gomantak

Mumbai-Goa Vande Bharat: मुंबई-गोवा महामार्गावर लवकरच सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या एक्स्प्रेसची चाचणी आज (मंगळवार) मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर घेतली जाणार आहे.

चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसएमटी-मडगाव मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. मुंबईतून सुटणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसचा चाचणी दरम्यान असा असेल प्रवास

'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतात विकसित केलेली 16 डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस मंगळवारी पहाटे 5.35 वाजता सीएसएमटी स्थानकातून सुटून गोव्यात मडगावला दुपारी 2.30 वाजता पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस त्याच रात्री 11 वाजता पुन्हा सीएसएमटीला पोहोचणे अपेक्षित आहे.

मुंबई-गोवा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण गेल्या महिन्यात पूर्ण झाले असून चाचणीनंतर नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे.

Mumbai-Goa Vande Bharat
Karnataka Viral Video: 'इडली सांबर अच्छा है, गोवावाला...', कर्नाटकात काँग्रेस आमदार समर्थकांनी घोषणा देताना ओलांडली मर्यादा

मुंबईतून सुटणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस आहे.

मुंबईतून सुटणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. यापूर्वी मुंबई सीएसएमटी - अहमदाबाद - गांधीनगर, मुंबई सीएसएमटी - साईनगर शिर्डी, मुंबई सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. त्यानंतर आता मुंबई सीएसएमटी ते गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.

अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेसमध्ये स्वयंचलित दरवाजे, वाय-फाय, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस जास्तीत जास्त 180 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com