Abandoned vehicles in South Goa Dainik Gomantak
गोवा

रस्त्यांवरील बेवारस वाहनं त्वरित हटवा, मागणीला जोर; सरकारतर्फे काहीच उपाययोजना नसल्यानं नाराजी

Abandoned vehicles in South Goa: दक्षिण गोव्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर टाकून दिलेली असंख्य वाहने आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: दक्षिण गोव्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर टाकून दिलेली असंख्य वाहने आहेत. ती हटविण्यासाठी सरकारतर्फे काहीच उपाययोजना केली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या या वाहनांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात, त्यात आरोग्याचा प्रमुख प्रश्न आहे. त्यामुळे ही वाहने हटवण्याची तसेच त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठीच्या मागणीला जोर आला आहे.

गोवा कॅनच्या लॉर्ना फर्नांडिस यांनी सांगितले की, आम्ही या टाकून दिलेल्या वाहनांचा प्रश्न दक्षिण गोवा रस्ता सुरक्षा बैठकीत उपस्थित केला होता, पण प्रशासनाकडून आम्हाला ठोस उत्तर मिळालेले नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारतर्फे एक अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी व पोलिस एकत्र येऊन पंचायत व नगरपालिकांशी संपर्क साधून टाकून दिलेल्या वाहनांची माहिती गोळा करणार, एक अहवाल तयार करणार व नंतर ती हटविण्यासाठी किंवा विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार.

पण प्रत्यक्षात नेमकी ही प्रक्रिया कुठे पोहोचली याबद्दल काहीच माहिती देण्यात आली नाही, असे फर्नांडिस यांनी सांगितले. मडगाव शहर भागातही अनेक वाहने बेवासर पडून आहेत.

मडगाव पोलिस स्थानकाच्या मागे वाहनांचा खच

मडगावमधील समाजसेवक व माजी नगरसेवक जाफर बुधानी यांनी सांगितले की, पोलिस स्थानकाच्या मागे असलेल्या पोलिस क्वार्टर्स परिसरात असंख्य वाहने टाकून देण्यात आली आहेत. ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. पण पोलिसांनी त्याबद्दल काहीच निर्णय घेतला नसल्याचे कळते.

ही सर्व वाहने जप्त केली आहेत व काही वाहनांबद्दल न्यायालयात खटले चालू आहेत. तरीसुद्धा अशी वर्षानुवर्षे वाहने टाकून देणे या क्वार्टर्समध्ये राहणाऱ्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका उद्भवू शकतो. पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे. पाऊस जवळ येऊन ठेपला आहे; तत्पूर्वी हा परिसर स्वच्छ होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT