Som Yag Yadnya 2023 Sandip Desai
गोवा

Som Yag Yadnya 2023 : अवभृथस्नान, पूर्णाहुतीने यज्ञ उत्सवाची सांगता

5 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत अग्निष्टोम महासोमयाग संपन्न झाला

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa : विश्वशांती आणि वातावरण शुद्धीसाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित सहा दिवसीय अग्निष्टोम महासोमयागाचा शुक्रवारी (ता. 10) साळ नदीवर अवभृथस्नानाने सांगता झाली. त्यानंतर पूर्णाहुती होऊन हा यज्ञ दुपारी तीन वाजता संपन्न झाला.

महासोमयागानिमित्त दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विविध धार्मिक विधी झाले. दरम्यानच्या काळात भाविकांनी यज्ञस्थळी भेट देत अग्निदेवतेचा आशीर्वाद घेत महाप्रसाद आस्वाद घेतला. शुक्रवारी अग्निष्टोम महासोमयागाची पूर्णाहुती झाली.

यज्ञ परंपरेनुसार साळ बंधाऱ्याच्या नदीकाठी अवभृथस्नान संपन्न झाले. यज्ञ भूमीपासून साळ बंधाऱ्यापर्यंत जाण्यासाठी यजमान तसेच भाविकांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. स्नान करून यज्ञस्थळी परतल्यानंतर दुपारी एक वाजता यज्ञस्थळी महाप्रसाद सुरू झाला. यावेळी शेकडो भक्त आणि भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

महासोमयागस्थळी सोमयाग दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था केली होती. गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवक यज्ञस्थळी कार्यरत होते. सर्वांच्या सहयोगातून हा सहा दिवसांचा अद्‍भूत उपक्रम उत्साहात संपन्न झाला.

5 ते 10 फेब्रुवारी हा अग्निष्टोम महासोमयाग काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात संपन्न झाला. विश्वशांतीसाठी तसेच सकारात्मक ऊर्जा निर्मिती, वातावरण शुद्धी, मनःशांती, आत्मिक समाधान आणि विश्व कल्याण हेतूने वैदिक ऋषींनी सांगितलेल्या या अग्निष्टोम महासोमयागाचे गोव्यात प्रथमच हे आयोजन केले होते.

या नित्य सार्वत्रिक उपासनेने वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक आणि अखिल चराचर सृष्टीचे कल्याण होते. महासोमयागमध्ये १७ मुख्य तर १७ उपमुख्य पुरोहितांनी विविध मंत्रोच्चार तसेच वेदाचे पठण करुन यज्ञस्थळी विविध ईष्ट्या पार पाडल्या.

1. अवभृथस्नानासाठी श्रींच्या पादुका आणि मुख्य पुरोहितांसह यजमान व इतर मंडळी साळ नदीवर गेली होती. तिथे अवभृथस्नान करणाऱ्यांसाठी चेंजिंग रूमची विशेष व्यवस्था केली होती. घाट पूर्णपणे साफ करून घेतला होता.

2. यजमान सोमयाजी सुहोता आपटे व सुहोता समृद्धी दीक्षित आपटे यांच्यासह आपटे कुटुंबीय तसेच यज्ञस्थळी उपस्थित भाविकांनी अवभृथस्‍नान केले. यावेळी पुरोहितांकडून मंत्रोच्चार व इतर विधी गेल्या. त्याचप्रमाणे सहा दिवस यज्ञस्थळी वापरलेली भांडी तसेच इतर पात्रे या साळ नदीच्या पात्रात विसर्जन केली.

3. सहा दिवस मिळून एकूण 25 विधी यज्ञस्थळी झाले. यामध्ये आठ ईष्टी, तीन सवन, सहा प्रवर्ग्य, अभृथस्नान आदींचा समावेश होता. तर शेवटच्या दिवशी उदयनेईष्टी, मैत्रावरुणईष्टी व त्यानंतर पूर्णाहुतीने या महासोमयागाची शुक्रवारी सांगता झाली. दररोजच्या प्रमाणे शेवटच्या दिवशी भाविकांनी यज्ञस्थळी गर्दी केलेली.

लक्षणीय उपस्थिती!

सहा दिवस चाललेल्या या यागाचे मुख्य आकर्षण हे प्रवर्ग्य विधी होते. हा प्रवर्ग्य विधी अनुभवण्यासाठी भाविकांनी यज्ञस्थळी तीन दिवस लक्षणीय उपस्थिती लावलेली. या विधीत मातीच्या छोट्या पात्रात (महावीर) तूप उत्कलन बिंदूपर्यंत तापवले जाते. यावेळी प्रवर्ग्य यज्ञसंबंधित मंत्रोच्चार पठण केले जाते. तसेच गाईचे व शेळीचे दूध काढून ते महावीर पात्रातील तुपावर ओतले जाते. त्यामुळे अग्निज्वाळा या 25 ते 30 फुटापर्यंत उंच उसळल्या होत्या. त्याचप्रमाणे हवनकुंड अर्थात यज्ञदेवीस परिक्रमा करण्यासाठी हवनकुंडांना प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांची संख्या मोठी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT