Som Yag Yadnya 2023 Goa: अग्निष्टोम् महासोमयाग! सकारात्मक उर्जा, वातावरण शुद्धी आणि मन:शांतीचा दुसरा दिवस

अखंड मंत्रोच्चारात सकारात्मक उर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी आणि मन:शांती व आध्यात्मिक समाधानाचा अनुभव दुसऱ्या दिवशी उपस्थितांनी घेतला.
Som Yag Yadnya 2023 Goa
Som Yag Yadnya 2023 GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोमन्तक- सकाळ समूह आयोजित अग्निष्टोम महासोमयाग म्हापसात काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थानच्या परिसरात हा सोमयाग सुरू आहे. विश्वकल्याणार्थ आयोजित या महासोमयागाला रविवारपासून प्रारंभ झाला आहे. आज यज्ञाच्या दुसऱ्या दिवशी प्रसन्न वातावरणात विविध विधी पार पडले.

अखंड मंत्रोच्चारात सकारात्मक उर्जानिर्मिती, वातावरण शुद्धी आणि मन:शांती व आध्यात्मिक समाधानाचा अनुभव दुसऱ्या दिवशी उपस्थितांनी घेतला.

असा पार दुसरा दिवस

दुसऱ्या दिवसाची सुरूवात पहाटे प्रायणीय येष्टि यज्ञाद्वारे झाली.

प्रायणीय येष्टि म्हणजे काय?

देवांना दिशांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने त्यावेळी देवमाता आदिती यांनी देवतांना सर्व दिशांची माहिती करून दिली. त्यावेळी देवमाता आदितीसाठी विशेष यज्ञ करण्यात आला यालाच 'प्रायणीय येष्टि' असे म्हणतात. दिशादर्शनाचे काम केल्यामुळे सर्व देवतांनी आदितीला वर दिला. त्यानुसार यज्ञाचा आरंभ आणि समाप्तीला 'उदयनी' नावाचा यज्ञ केला जाईल. असे देवतांनी सांगितले.

प्रायणीयनंतर सोमक्रय नावाचा दुसरा विधी करण्यात आला.

सोम म्हणजे या यज्ञाला लागणारी सोम वनस्पती, सोम विक्रेत्याकडून ती विकत घेणे त्याला क्रय असे म्हटले आहे. सोम ही सर्व औषधी वनस्पतींची प्रधान राजा आहे अशी मान्यता. ही वनस्पती राजा असल्यामुळे त्याला बैलगाडीत ठेवून, सुब्रम्हण्य नावाच्या एका रूत्विजाने त्याला प्रत्यक्ष राजा बनवून त्याची मिरवणूक काढून यज्ञ शाळेजवळ आणले जाते. आपल्या घरी आथिती आला या अर्थाने आथित्य येष्टी करून त्याला सोमराजाला घरात घेतले जाते. त्यानंतर सर्व रूत्विज यजमानासमोर शपथ घेतात.

सोम वनस्पतीवर काही वाईट प्रभाव पडू नये यासाठी प्रात:काळी तिच्यावर सोन्याचे पाणी शिंपडण्याची प्रथा आहे.

प्रवर्ग्य विधान

वातावरण शुद्ध राहावेत, सर्व सहा ऋतू यथायोग्य पद्धतीने चालावेत अति वृष्टी, अति उन्हाळा अशा नैसर्गिक आपदा येऊ नयेत यासाठी प्रवर्ग्य विधान केला जातो. प्रवर्ग्य विधानात सर्व रूत्विज मिळून 300-350 मंत्रोच्चार करतात. यात पहिल्यांदा गाई, दुसऱ्यांदा शेळी आणि अखेरीस गाई व शेळीच्या दुधाची आहूती दिली जाते. यज्ञाच्या ज्वाला खूप वरती जातील अशी ही योजना असते व त्या जातात. वातावरण शुद्ध व्हावे आणि ऋतुचक्र सुव्यवस्थित चालावे असा या मागचा हेतू असतो.

प्रवर्ग्य विधीनंतर लगेचच उपसद नावाची विधी केली जाते. त्यानंतर सर्व सुब्रम्हण्य इंद्र देवाला सोम भक्षण करण्यासाठी आवाहन करतात. "हे इंद्र देवा तू तुझ्या सर्व गणांसह यज्ञाच्या तिसऱ्या दिवशी सोम भक्षण करण्यासाठी ये, आम्हा सर्वांना उपकृत कर तसेच, सर्व सृष्टीची रक्षा तुझ्या शक्तीने कर." अशी प्रार्थना देवाला केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com