Solapur Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Solapur Goa Flight: फक्त 689 रुपयांत करा सोलापूर ते गोवा विमान प्रवास; नव्या विमानसेवेचे वेळापत्रक, तिकिटदर जाहीर

Solapur Goa Flight: पुढील महिन्यात २१ डिसेंबर पासून या विमानसेवेला सुरुवात होणार असून, यासाठीचे संभाव्य तिकिटदर आणि वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Pramod Yadav

Solapur Goa Flight

सोलापुरातून मुंबई आणि गोव्यासाठी नव्याने विमानसेवा सुरु करण्याची घोषणा फ्लाय ९१ या विमान कंपनीने काही दिवसांपूर्वी केली. मूळ गोमंतकीय असणाऱ्या या कंपनीने आता या विमानसेवेचे संभाव्य तिकीटदर आणि वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. विशेष बाब म्हणजे समोर आलेल्या माहितीनुसार सोलापूर ते गोवा विमानप्रवास केवळ 689 रुपयांत शक्य होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी फ्लाय ९१ या कंपनीने देशांतर्गत विमानसेवेचा शुभारंभ केला. सुरुवातीला देशातील काही महत्वाची शहरे जसे की जळगाव, मुंबई, सिंधुदुर्ग, बंगळुरु, आगत्ती यासारख्या शहरांना गोव्यातून थेट विमानसेवेची घोषणा केली. कंपनीने सुरु केलेल्या भारत अनबाऊन्ड या सिरिजमध्ये आता सोलापूर ते मुंबई आणि गोवा या विमानसेवेची घोषण केलीय. पुढील महिन्यात २१ डिसेंबर पासून या विमानसेवेला सुरुवात होणार असून, यासाठीचे संभाव्य तिकिटदर आणि वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सोलापूर ते गोवा तिकीट (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) (Solapur Goa Flight Ticket Rate/ Fare)

सोलापूर ते गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) फ्लाईटसाठी तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त ६८९ रुपये ठेवण्यात आला आहे. दरम्यान, स्लॅबनुसार हा दर ८,७८५ रुपये पर्यंत जातो. अतिरिक्त शुल्कातही UDF, ASF, आणि GST चा समावेश आहे.

सोलापूर ते मुंबई तिकीट ((Solapur Mumbai Flight Ticket Rate/ Fare)

सोलापूर ते मुंबईसाठी फ्लाय ९१ तिकिटांसाठी सुरुवातीचा दर १,४८८ पासून सुरू होतो. विविध स्लॅबमध्ये तिकिटाचे दर वाढत जातात. यात सर्वाधिक दर ९,५८४ इतका आहे.

अतिरिक्त शुल्कात २१७ रुपये युजर डेव्हलपमेंट फी (UDF), २३६ रुपये विमान सुरक्षा शुल्क (ASF), आणि ५ टक्के GST यांचा समावेश होतो.

गोवा सोलापूर विमानसेवेचे वेळापत्रक

गोवा ते सोलापूर

विमान सुटण्याची वेळ: सकाळी 8:00

पोहोचण्याची वेळ: सकाळी 9:10

सोलापूर ते गोवा

सुटण्याची वेळ: दुपारी 2:15

पोहोचण्याची वेळ: दुपारी 3:30

मुंबई सोलापूर विमानसेवेचे वेळापत्रक

मुंबई ते सोलापूर

विमान सुटण्याची वेळ: सकाळी 11:55

पोहोचण्याची वेळ: दुपारी 1:45

सोलापूर ते मुंबई

सुटण्याची वेळ वेळ: सकाळी 9:40

पोहोचण्याची वेळ: सकाळी 11:20

कुठे कराल बुकिंग (Online Flight Booking)

सोलापूर गोवा आणि मुंबई या नव्या विमानसेवेचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या विमानसेवेबाबत अधिक माहितीसाठी फ्लाय-९१ या विमान कंपनीच्या (fly91.in) या संकेतस्थळाला भेट देता येईल. तसेच, तिकिट बुकिंगसाठी येथे क्लिक करा.

स्वस्त दरात होणार प्रवास

सोलापूर गोवा किंवा मुंबईसाठीचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला परवडेल अशा दरात फ्लाय ९१ या कंपनीने ठेवला आहे. यामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

Goa Film Festival: गोवा चित्रपट महोत्सव कोणासाठी? की फक्त औपचारिक सोहळ्यांचे आयोजन..

SCROLL FOR NEXT