बेळगावातून गोव्यासाठी आता नियमित विमानसेवा सुरु होणार आहे. गोमंतकीय फ्लाय-९१ या विमान कंपनीला नव्या सेवेसाठी DGCA ची परवानगी मिळाली आहे. यामुळे बेळगावची हुबळी आणि हैदराबादशी देखील थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
मूळ गोमंतकीय असणाऱ्या फ्लाय-९१ कंपनीने काही महिन्यांपूर्वी विमानसेवेचा शुभारंभ केला. गोव्यातून हैदराबाद, पुणे, आगती, जळगाव आणि सिंधुदुर्ग या ठिकाणांना जोडणारी विमानसेवा सुरु केली. त्यानंतर आता कंपनी विस्तारत असताना त्यात नवे मार्ग वाढविण्यात येत आहेत.
DGCA ने कंपनीला या नव्या मार्गावर विमानसेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लाय – ९१ बेळगाव गोवा मार्गावर विमानसेवेसाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार त्यांना परवानगी मिळाली आहे.
दरम्यान, सेवेचा शुभारंभ कधी होईल, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. DGCA कडून परवानगी मिळण्याचा अर्थ कंपनी सेवा सुरु करण्यास इच्छुक आहे. पण, फ्लाय-९१ ने अद्याप बेळगाव विमानतळाशी संपर्क साधला नसल्याची माहिती आहे.
बेळगाव – गोवा विमानसेवेच्या घोषणेने आसपासच्या प्रवाशांमध्ये आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. बेळगावातून गोव्याला दररोज हजारो लोक भेट देत असतात. शिवाय दक्षिणेतील पर्यटकांसाठी देखील पर्याय उपयुक्त ठरणार आहे.
बेळगावातून गोव्याला कार्गो फ्लाईट सुरु करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून सुरु आहे. बेळगावातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक गोव्याला होत असते. त्यामुळे कार्गोची मागणी केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.