Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Drowning Death: समुद्रस्नान बेतले जीवावर! कांदोळी समुद्रात सोलापूरच्या उद्योजकाचा बुडून मृत्यू, मुलगी थोडक्यात वाचली

Solapur businessman drowns Candolim: कांदोळी समुद्रकिनारी सोमवारी सकाळी समुद्रस्नान करताना सोलापूर येथील प्रसिद्ध कंत्राटदार व व्यावसायिक सतीश उद्धव भोसले (५४, रा. जानकीनगर-जुळे) यांचा बुडून मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कांदोळी समुद्रकिनारी सोमवारी सकाळी समुद्रस्नान करताना सोलापूर येथील प्रसिद्ध कंत्राटदार व व्यावसायिक सतीश उद्धव भोसले (५४, रा. जानकीनगर-जुळे) यांचा बुडून मृत्यू झाला. गोव्यात कुटुंबासोबत पर्यटनासाठी आले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंब २८ मे रोजी गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी साडेआठच्‍या सुमारास नाश्ता केल्यानंतर हे कुटुंबीय समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी गेले. त्यावेळी सतीश भोसले हे आपल्या १६ वर्षीय मुलीसह समुद्रस्नानासाठी पाण्यात उतरले होते, तर इतर कुटुंबीय किनाऱ्यावर थांबले होते.

समुद्रस्नान सुरू असताना अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेने बाप-लेकीला समुद्राच्या आत ओढले. मुलगी प्रसंगावधान राखत कशीबशी किनाऱ्यावर पोहोचली. मात्र, वडील दिसत नसल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि जीवरक्षक घटनास्थळी धावले.

जीवरक्षकांनी तत्काळ समुद्रात शोधमोहीम राबवून सतीश भोसले यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अधिक तपास सुरू आहे.

क्षणात दुर्घटना

समुद्र तुलनेने शांत दिसत असला तरी अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मुलगी सुरक्षितपणे बाहेर आली; मात्र वडील सतीश भोसले यांना लाटेने समुद्राच्या आत ओढले. गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबाच्या आनंददायी सहलीचे काही क्षणांत दुःखद घटनेत रूपांतर झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT