US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार मुसंडी मारत संसदेच्या दोन्ही गृहात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
US Midterm Elections Result
Donald Trump Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने जोरदार मुसंडी मारत संसदेच्या दोन्ही गृहात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. डेमोक्रॅटिकने 'सीनेट' सोबतच कनिष्ट सभागृहातही स्पष्ट बहुमत मिळवले. हा निकाल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या राजवटीसाठी मोठा झटका मानला जात असून, यामुळे काँग्रेसमध्ये ट्रम्प यांच्याशी संघर्ष होणार हे स्पष्ट आहे.

टेक्सासपासून आयोवा आणि न्यू हॅम्पशायरपर्यंत अनेक राज्यांत डेमोक्रॅट्सनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. विशेष म्हणजे, यात ती राज्येही आहेत जिथे दोन वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. वाढती महागाई, इराणसोबतची युद्धजन्य परिस्थिती आणि सरकारमधील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरुन जनतेमध्ये असलेल्या तीव्र रोषाचे प्रतिबिंब या निकालामध्ये उमटले.

US Midterm Elections Result
Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

संसदेच्या दोन्ही गृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण आल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळाची संपूर्ण दिशा बदलण्याची दाट शक्यता आहे. ट्रम्प यांच्या धोरणांना पुढे नेण्याच्या मार्गात आता मोठे कायदेशीर व राजकीय अडथळे निर्माण होऊ शकतात. निवडणुकीच्या या निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अभिनंदन केले.

US Midterm Elections Result
Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

ट्रम्प म्हणाले की, विरोधकांनी या निवडणुकीत चांगले प्रदर्शन केले असून आपण एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक आहोत. यावेळी आपण स्वतः निवडणुकीच्या मैदानात नसल्याचे सांगत जर आपण स्वतः उभे राहिलो असतो तर विजय निश्चित होता, असा दावाही ट्रम्प यांनी केला.आपल्याकडे पूर्ण 'व्हेटो' पॉवर असल्याचे सांगत विरोधी पक्षासोबत जुळवून घेत काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टेक्सास, नॉर्थ कॅरोलिना, साउथ कॅरोलिना आणि आयोवा यांसारख्या राज्यांमध्ये जिथे ट्रम्प यांनी स्वतः जातीने प्रचार करत पक्षासाठी मते मागितली होती, तिथेही डेमोक्रॅट्सनी सीनेटच्या जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.