Goa Tourism: परदेशी सहलींना ब्रेक; गोव्याच्या पर्यटनाला नवसंजीवनी, गेल्‍या 15 दिवसांत वाढली पर्यटकांची संख्‍या

Goa tourism revival 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना परदेशातील सुट्ट्या आणि डेस्टिनेशन वेडिंग्सऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचे केलेले आवाहन गोव्याच्या पर्यटन उद्योगासाठी दिलासादायक ठरत आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना परदेशातील सुट्ट्या आणि डेस्टिनेशन वेडिंग्सऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचे केलेले आवाहन गोव्याच्या पर्यटन उद्योगासाठी दिलासादायक ठरत आहे.

जागतिक स्तरावरील संघर्ष, विमानसेवांवरील परिणाम आणि व्हिसासंबंधी अडचणी असूनही गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचा दावा पर्यटन विभागाने केला आहे.

Goa Tourism
Goa Congress: विरियातो, कवठणकरांची बैठकीला दांडी; काँगेस पक्षातील अंतर्गत समन्वयावर प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित

गोवा हे केवळ समुद्रकिनाऱ्यांचे राज्य नसून सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वारसा पर्यटनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे विभागाने नमूद केले. पावसाळ्यात गोव्याचे सौंदर्य एका वेगळ्याच रूपात खुलते. दूधसागरसह राज्यातील विविध धबधबे, हिरवाईने नटलेली गावे आणि सह्याद्रीचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो.

या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी सुलभ रस्ते, सुरक्षितता उपाययोजना आणि पर्यावरणपूरक ‘व्ह्यूइंग डेक्स’ उभारण्यावर भर दिला जात आहे. शिवाय, गोव्याच्या समृद्ध इंडो-पोर्तुगीज वारशाची ओळख करून देणारे गाइडेड व्‍हिलेज वॉक, हेरिटेज टूर सुरू करण्यात येत आहेत.

Goa Tourism
Goa Crime: बोटमालकाचा खून करून मृतदेह फेकला समुद्रात? वास्‍कोत खळबळ, संशयाची सुई कामगारांकडे

व्यावसायिक सुखावले; अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार

ट्रॅव्हल ॲण्‍ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांच्या माहितीनुसार, १५ मेपासून गेल्या दोन आठवड्यांत राज्यात पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली आहे. या कालावधीत पर्यटन व्यावसायिकांना चांगला व्यवसाय मिळाला असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळाला आहे.पूर्वी सुट्ट्यांच्या काळात अनेक पर्यटक परदेशातील पर्यटनाला प्राधान्य देत असत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अनेक राज्यांतील पर्यटकांनी पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून गोव्याची निवड केली आहे.

३६५ दिवस पर्यटनासाठी गोवा सज्ज : पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे की, गोवा आता केवळ ‘सन ॲण्‍ड सँड’ पर्यटनापुरता मर्यादित राहिलेला नाही. हिरवेगार भातशेतीचे पट्टे, धबधबे, ग्रामीण पर्यटन आणि पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य यामुळे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता गोव्याने निर्माण केली आहे. त्यामुळे गोवा ३६५ दिवस पर्यटनासाठी सज्ज असल्याचा विश्वास पर्यटन विभागाने व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com