Goa Congress: विरियातो, कवठणकरांची बैठकीला दांडी; काँगेस पक्षातील अंतर्गत समन्वयावर प्रश्‍‍नचिन्‍ह उपस्‍थित

Goa Politics: प्रदेश काँग्रेस समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस आणि नव्याने नियुक्त समन्वय समितीचे को-चेअरपर्सन सुनील कवठणकर अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: प्रदेश काँग्रेस समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस आणि नव्याने नियुक्त समन्वय समितीचे को-चेअरपर्सन सुनील कवठणकर अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले. या दोन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षातील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल सायंकाळी बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला खासदार विरियातो फर्नांडिस आणि सुनील कवठणकर हे दोघेही उपस्थित नव्हते. त्यामुळे बैठकीनंतर काँग्रेस भवनात त्यांच्या गैरहजेरीबाबत चर्चा पाहायला मिळाली.

Goa Congress
Goa Crime: बोटमालकाचा खून करून मृतदेह फेकला समुद्रात? वास्‍कोत खळबळ, संशयाची सुई कामगारांकडे

प्रदेशाध्यक्ष बदलानंतर हालचाली वाढल्या

प्रदेश काँग्रेस समितीमध्ये अलीकडील बदलानंतर कार्यालयीन हालचाली वाढल्या आहेत. गिरीश चोडणकर यांच्या समर्थकांची उपस्थिती वाढताना दिसत आहे. मात्र काही प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षातील अंतर्गत समन्वय आणि एकजुटीबाबत प्रश्नचिन्‍ह उपस्थित होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com