पणजी: गोव्यात परवानगी शिवाय फोटोग्राफी अथवा व्हिडिओग्राफी करण्यास बंदी आहे. पर्यटन विभागाने तशी नियमावलीच तयार केलीय. पण, या नियमावलीची सतत पायमल्ली होताना दिसून येते. असाच एक संतपाजनक व्हिडिओ सध्या दक्षिण गोव्यातील एका समुद्रकिनाऱ्यावरुन समोर आला आहे. या व्हिडिओवरुन अशा लोचट पर्यटकांना हाकलून द्यायला पाहिजे, अशा शब्दात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Reddit या समाज माध्यमावर याबाबतचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका महिलेने गोवा सबरेडिटवरुन एक पोस्ट शेअर केली असून, दोन देशी पर्यटक समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद घेणाऱ्या विदेशी महिलेचे मोबाईवर चित्रिकरण करताना दिसत आहेत.
"विदेशी पर्यटक महिला लहान मुलीसोबत बीचवर खेळताना दिसत असून, दोघेजण त्या महिलेचे चित्रिकरण करत होते", असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
"या दोघांचा मी व्हिडिओ करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी मला झटकले पण, काही वेळाने पुन्हा त्यांनी महिलेचा व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. मी तेथील लाईफगार्ड्सना त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगितले. लज्जित झालेल्या त्या विदेशी महिलेने देखील थोड्यावेळाने समुद्रातून बाहेर पडणे पसंत केले", असा दावा या महिलेने पोस्टमध्ये केला आहे.
या व्हिडिओवरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. "अशा घटनांमुळेच गोमंतकीय बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांपासून नाराज असतात. कारण, अशा प्रकारचे पर्यटक आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलोय", अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.
तर, "ही पहिलीच वेळ नाही. अशा घटना रोखण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर पोलिसांची पाळत हवी. नाहीतर अशा घटना थांबणार नाहीत. लहान मुलांचे अशाप्रकारे चित्रिकरण केले जाते ही धक्कादायक बाब आहे", असे दुसऱ्या एका युझरने म्हटले आहे.
तसेच, आणखी एकाने अशा पर्यटकांना अटक करुन योग्य कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
"मी गोमंतकीय नाही पण हे गमचा घेतलेले लोक ९० टक्के समस्या निर्माण करतात. अशा लोकांना त्यांच्याच जिल्ह्यातून बाहेर पडू दिले नाही पाहिजे", असे मत एकाने मांडले आहे.
गोवा पर्यटन खात्याने राज्यात परवानगी शिवाय पर्यटकांचे फोटो काढण्यास अथवा व्हिडिओ चित्रिकरण करण्यास बंदी घातली आहे. असे प्रकार आढळून आल्यास संबधितांवर कारवाई केली जाते. गेल्या आठवड्यात बिहारमधून आलेल्या पर्यटकांनी देखील बागा समुद्रकिनारी फोटो काढत नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दखल घेत दोघांना अटक करत दंडात्मक कारवाई केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.