Shiroda Parents Teacher Issue Dainik Gomantak
गोवा

Shiroda School Dispute: "आमकां वंदना टीचर नाका!" म्हणत शिरोड्यातील सरकारी शाळेवर विद्यार्थ्यांचा बहिष्कार

Shiroda Government School Teacher Issue: शिक्षिका पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण देत नसल्याचे पालकांचे म्हणणे असून तिची लवकरच बदली व्हावी आणि तेव्हाच विद्यार्थी शाळेत येतील अशी मागणी केली जातेय

Akshata Chhatre

Tariwada Government School Protest

शिरोडा: विद्यार्थी अवस्थेत घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर पुढील आयुष्याची इमारत उभी राहते आणि म्हणूनच शिक्षकाची भूमिका महत्वाची ठरते. बुधवारी (दि. ११ डिसेंबर) रोजी सकाळी शिरोड्यातील तारीवाडा या गावातील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी शाळेच्या बाहेर वंदना पाटील नावाच्या शिक्षिकेविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. ही शिक्षिका पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण देत नसल्याचे पालकांचे म्हणणे असून तिची लवकरच बदली व्हावी आणि तेव्हाच विद्यार्थी शाळेत येतील अशी मागणी केली जातेय.

काय म्हणतायत पालक?

तारीवाडा शिरोडा येथे सप्टेंबर महिन्यापासून वंदना पाटील ही शिक्षिका म्हणून रुजू झाली मात्र तेव्हापासून ते आत्तापर्यंत या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसाठी काहीही विशेष मेहनत न घेतल्याचं पालक म्हणाले आहेत. शाळेत आल्याआल्या ती केवळ मोबाईल फोन घेऊन बसलेली पाहायला मिळते आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. यापूर्वी शाळेत कार्यरत असलेली शिक्षिका इयत्ता पहिली ते चौथी चारही वर्गामध्ये शिकवायची वंदना पाटील मात्र "पहिली आणि दुसरीच्या वर्गांना मला शिकवता येत नाही" म्हणून टाळाटाळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांची फार गरज असते मात्र ही शिक्षिका त्यातही रस न घेतल्याचं पालकांनी सांगितलं, तसेच शिक्षिका अनेकवेळा सुट्टीवर गेल्याने मुलं अभ्यासाचं नुकसान होत असल्याची तक्रार पालक करत आहेत आणि म्हणूनच लवकरच ही बातमी सरकार पर्यंत पोहोचवून शिक्षिकेची बदली करून द्यावी अशी मागणी माध्यमांसमोर केली आहे.

शिक्षिकेचे म्हणणे काय?

काही वैद्यकीय कारणांमुळे वंदना पाटील या शाळेत एप्रिल २०२५ पर्यंतच्या कालावधीसाठी रुजू झाल्या आहेत, मात्र रुजू झाल्यापासून काही पालक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. शिक्षण खात्याकडून झालेल्या चौकशीमध्ये देखील विद्यार्थ्यांनी शिक्षिकेबद्दल केवळ सकारात्मक उत्तरं दिल्याचं तिने सांगितलं. आत्तापर्यंत वंदना पाटील या शिक्षिकेने २३ वर्ष शिक्षिका म्हणून विविध शाळांमध्ये काम केलं आहे.

काही पालक सतत त्यांना शाळा सोडून जाण्याची धमकी देत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि याच धमक्यांना कंटाळून, आणि होणाऱ्या मानसिक त्रासामुळे तिने काहीकाळ सुट्टी घेतली असल्याचं वंदना पाटील म्हणाली आहे. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी शिक्षिका नेमलेली आहे आणि म्हणून वंदना पाटील कधीही त्या मुलांना शिकवत नाहीत अशी माहिती तिने स्वतः दिली, या सततच्या त्रासामुळे वंदना पाटील या शिक्षिकेने देखील पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

New Zuari Bridge: 'झुआरी'वरील मनोऱ्याचे काम 2031 पर्यंत पूर्ण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

Arpora Nightclub Fire: क्लबच्या तीन कर्मचाऱ्यांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब, अंतरिम जामिनावर मंगळवारी, तर मुख्य अर्जावर 28 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT