Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Saint Francis Xavier school issued show cause notice; students' safety endangered at waterfall: महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना चरावणे येथे वर्षा पर्यटनाला घेऊन गेले असता ४७ विद्यार्थी अडकून पडले होते.
Rescue Operation at Valpoi
Rescue Operation at Valpoi Dainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: येथील संत फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाला शिक्षण खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना धबधब्यावर घेऊन जात त्याचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका शाळा व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे. व्यवस्थापनाला येत्या सात दिवसात शिक्षण खात्याला उत्तर द्यावे लागणार आहे.

संत फ्रान्सिस झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयातील ४७ विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन सत्तरी तालुक्यातील चरावणे धबधब्यावर वर्षा पर्यटनासाठी घेऊन गेले होते. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यानंतर विद्यार्थी तेथेच अडकून पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले होते. २६ सप्टेंबर २०२४ रोजी ही घटना उघडकीस आली होती.

Rescue Operation at Valpoi
UCC and One Nation One Election : UCC, एक देश एक निवडणुकीची देशाला गरज; मुख्यमंत्री सावंत यांचे संविधान दिनी पुन्हा भाष्य

गोव्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. असे असताना देखील झेवियर विद्यालयात शिकणाऱ्या ११ वी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना चरावणे येथे वर्षा पर्यटनाला घेऊन जाण्यात आले. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने ४७ विद्यार्थी धबधब्यावर अडकून पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com