Shirgao Mining Transport Dainik Gomantak
गोवा

Shirgao: शिरगावात खनिज वाहतूक रोखली, पोलीस घटनास्थळी दाखल; अपघातांबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन

Shirgao Mining Transport: अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, अशी मागणी करीत शिरगावच्या लोकांनी (शुक्रवारी) बांदेकर खाणीवरील खनिज वाहतूक रोखून धरली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, अशी मागणी करीत शिरगावच्या लोकांनी (शुक्रवारी) बांदेकर खाणीवरील खनिज वाहतूक रोखून धरली. अखेर स्थानिक लोकांनी केलेली मागणी खाण कंपनीच्या व्यवस्थापनाने मान्य करून उपाययोजना करण्याचे आश्वासन देताच स्थानिकांनी आंदोलन मागे घेतले.

त्यामुळे जवळपास तीन तास अडकून पडलेली खनिज वाहतूक एकदाची सुरू झाली. असुरक्षितपणे होणाऱ्या खनिज वाहतुकीचा मुद्दा पुढे करुन अजय गावकर यांच्या नेतृत्वाखालील शिरगावचे काही नागरिक सकाळी रस्त्यावर उतरले.

शिरगाव येथे मुख्य रस्त्याला जोडून असलेल्या बांदेकर खाण कंपनीच्या रस्त्यावर या लोकांनी खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. बांदेकर कंपनीचे खाण व्यवस्थापक विनोद सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून उपाय करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थांचा ठिय्या

पाळे -शिरदोन येथील जमिनीचे ‘३९- ए’ अंतर्गत रूपांतरण करण्यात आले आहे. ते रुपांतरण रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी नगर नियोजन (टीसीपी) कार्यालयात सकाळी ठिय्या आंदोलन केले. मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यत ठिय्या मांडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT