Shirgao Stamepde: लईराई दुर्घटनेप्रकरणी कोणत्या समितीवर कारवाई? सरकारसमोर पेच; मुख्य सचिवांनी पाठवला CM सावंतांना अहवाल

Lairai Jatra Stampede: चेंगराचेंगरी प्रकरणी अधिकाऱ्यांकडून देवस्थान समितीवर खापर फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. असे असले तरी कोणत्या समितीवर कारवाई करायची हा प्रश्न उभा ठाकणार आहे.
Lairai Jatra Stampede
Lairai Jatra StampedeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी अधिकाऱ्यांकडून देवस्थान समितीवर खापर फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. असे असले तरी कोणत्या समितीवर कारवाई करायची हा प्रश्न उभा ठाकणार आहे.

गेल्या जत्रेपूर्वी महिनाभर आधीच देवस्थानची नवी समिती सत्तारुढ झाली होती. त्याआधीच्या प्रशासनाच्या बैठका जुन्या समितीसोबत झाल्या होत्या. त्यामुळे ३ मे रोजी झालेल्या चेंगराचेंगरीस कोणत्या समितीला जबाबदार ठरवावे असा सरकारसमोर पेच आहे.

या दुर्घटनेनंतर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते, तत्कालीन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर, डिचोलीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी जीवबा दळवी, डिचोलीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर, डिचोलीचे तत्कालीन मामलेदार अभिजीत गावकर, पंचायत सचिव संजय परब आणि मोपाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण चिमुलकर यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

Lairai Jatra Stampede
Lairai Stampede: 'लईराई' दुर्घटनेवरून अधिकाऱ्यांचे समितीकडे बोट, सूचना टाळल्याचा दावा; काय होता चौकशी समितीचा निष्कर्ष? वाचा..

त्या उत्तरात देवस्थान समिती व पंचायतीच्या असहकार्यामुळे ही दुर्घटना टाळता आली नाही, असे म्हटले आहे. आता चौकशी अहवालानंतर आलेल्या उत्तरांचे संकलन करून पुढील कारवाईसाठी राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी गृह सचिव या नात्याने अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पाठवला आहे.

Lairai Jatra Stampede
Shirgao Stampede: तथ्य शोध समितीचा अहवाल; शिरगाव चेंगराचेंगरीत माजी उत्तर गोवा एसपी, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीला धरले जबाबदार

दुसरी जत्रा जवळ येत असली तरी सरकारी पातळीवर कारवाईसाठी कोणत्याही हालचाली सुरू असल्याचे दिसत नाही. मात्र, अहवालातून शिफारशींनुसार भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी करता येण्याजोग्या उपाययोजनांवर सरकारचा भर आहे. त्यासाठी रस्ता रुंदीकरण लवकरच हाती घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com