Theft Case Dainik Gomantak
गोवा

Theft Case: शिरदोनमधील 12 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; भारतीय चलनासह डॉलर-पौंड अन् पासपोर्ट जप्त

Shirdon Theft Case: आगशी आणि जुने गोवे पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने उत्कृष्ट समन्वय दाखवत सुमारे १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आगशी आणि जुने गोवे पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने उत्कृष्ट समन्वय दाखवत सुमारे १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये भारतीय चलनासह विदेशी चलन आणि महत्त्वाच्या ओळखपत्रांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरदोण येथील व्यावसायिक जुआव पिरेस (४७) यांच्या घरी ही चोरी झाली. २९ ते ३० सप्टेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी तक्रारदाराच्या खोलीचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेली.

या प्रकरणी १ ऑक्टोबर रोजी आगशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ आणि ३२९(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून आगशी व जुने गोवे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे एक विशेष संयुक्त पथक तात्काळ तयार करण्यात आले.

पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक आणि उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. ही यशस्वी कारवाई आगशीचे पोलीस उपनिरीक्षक जाकी हुसेन, पीएसआय शुभम कोरगावकर, पीएसआय रक्षा नाईक तसेच जुने गोवे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पुरेश अडकोणकर, किशन नाईक आणि निलेश सखळकर यांनी केली.

भारतीय चलनासह विदेशी चलन जप्त

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात भारतीय चलन सुमारे १ लाख रुपये, अमेरिकन डॉलर सुमारे ५,९००, ब्रिटिश पौंड सुमारे ३,५०० आणि मूळ पोर्तुगीज पासपोर्ट, सिटिझन्स कार्ड व ओसीआय कार्डचा समावेश आहे. जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १२,००,००० रुपये (१२ लाख रुपये) आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Flyover Accident: बायणा उड्डाणपुलावर काळाचा घाला; कठड्याला दुचाकीची धडक, 20 फूट खाली कोसळून दोघांचा मृत्यू

Highest T20 Record: ख्रिसस गेलचा 175 धावांचा महाविक्रम इतिहासजमा, दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज बनला नवा 'युनिव्हर्स बॉस'; रचला इतिहास VIDEO

Gandhi Shastri Run: काणकोणमध्ये 'गांधी-शास्त्री रन'; 500 हून अधिक धावपटू धावणार, 5 किमी स्पर्धेचे आयोजन

Goa Affordable Housing: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठं पाऊल; पार्सेत 96,512 चौ. मी. सरकारी जमीन गृहनिर्माण मंडळाकडे

Asian Games 2026: गोल्फविश्वात भारताचा डंका! प्रणवी उर्सनं जिंकलं 'सुवर्णपदक', भारताची 24 वर्षांची प्रतीक्षा संपली; रचला नवा इतिहास

SCROLL FOR NEXT