Goa October Heat: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 'हिट'; राज्यात एका दिवसात तापमान 3.4 अंशांनी वाढले, उकाड्याने नागरिक हैराण

Goa October Heat 2026: राज्यात यंदा मागील पन्नास वर्षांतील सर्वांत कोरड्या मान्सूननंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे.
Goa October Heat 2026
Goa October HeatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात यंदा मागील पन्नास वर्षांतील सर्वांत कोरड्या मान्सूननंतर आता ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. सद्यःस्थितीत हवेतील आर्द्रता वाढली आहे. आकाशही निरभ्र असल्याने सूर्याची किरणे थेट पडत असल्याने मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला असून अक्षरशः घामाच्या धारा लागत आहेत. ‘ऑक्टोबर हिट सुरुवातीलाच जाणवू लागल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात ९५ टक्के इतक्या कमाल आर्द्रतेची नोंद करण्यात आली, जी सामान्य आर्द्रतेच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे. शुक्रवारी राज्यात ३४.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य तापमानाच्या तुलनेत तब्बल ३.४ अंशांनी अधिक होती. किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. जे सामान्य तापमानाच्या तुलनेत २ अंशांनी अधिक आहे. राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे उष्मा अधिक जाणविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Goa October Heat 2026
Mandovi River Goa: मांडवीचे विराट रूप अन् तिच्या पात्रातील 'आठवे बेट' आखाडा; जकातीपासून देवालयांपर्यंतचा रंजक इतिहास

समुद्री वाऱ्यामुळे आर्द्रता वाढली

समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे हवेतील आर्द्रता अधिक आहे. यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उकाड्याची तीव्रता जास्त जाणवत आहे. दिवसा कडक ऊन पडत असताना रात्रीचे तापमानही २४ ते २५ अंश सेल्सिअसच्या अधिक राहत असल्याने रात्रीच्या वेळीही पंखे आणि एसीशिवाय नागरिकांना घरी राहणे कठीण होत आहे. एरव्ही राज्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पाऊस पडायचा. त्यामुळे हवेत गारवा असायचा, परंतु सद्यःस्थितीत पाऊस पडण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. वेळेआधीच पाऊस कमी झाल्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत.

राज्यात सापेक्ष किंवा भासमान (रिलेटिव्ह) आर्द्रता वाढली आहे. त्यासोबतच तापमान वाढ होत आहे. यामुळे असह्य उष्मा जाणवत असून तापमान जरी ३४ अंशांवर गेले असले, तरी सद्यःस्थितीत ४० अंशांपर्यंत गेल्यासम वाटत आहे. नागरिकांनी वाढत्या उष्म्यात योग्य ती काळजी घ्यावी.

- डॉ. एम. आर. रमेशकुमार, शास्त्रज्ञ

Goa October Heat 2026
Goa Development Fund: 'गोव्याच्या विकासासाठी भरपूर निधी देऊ'; फोंड्यात शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन, 80 कोटींच्या धनादेशांचे वितरण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com