Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa: विभक्त कुटुंबीयांना मिळणार स्वतंत्र घर क्रमांक! मतभेद येणार संपुष्टात, सरकारने घेतला मोठा निर्णय

Separate House Number For Families Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की स्वतंत्र घर क्रमांक नसल्यामुळे कायदेशीर बाबी आणि इतर गोष्टींसाठी एकाच घरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत असे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एकाच घरात मात्र विभक्त राहणाऱ्या कुटुंबीयांना आता एकाच घर वा इमारतीसाठी स्वतंत्र घर क्रमांक मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वी क्लिष्ट असलेली ही प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी पंचायत संचालनालयामार्फत सरकारने परिपत्रक जारी केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, की स्वतंत्र घर क्रमांक नसल्यामुळे कायदेशीर बाबी आणि इतर गोष्टींसाठी एकाच घरात राहणाऱ्या विभक्त कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत असे. ग्रामीण भागात यावरून कुटुंबीयांत मतभेद-वाद निर्माण होत असत. हा प्रश्न सोडवण्यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसे परिपत्रकही पंचायत संचालनालयाने जारी केले आहे. ते येत्या सोमवारपासून लागू होईल.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात; पण वेगवेगळ्या स्वयंपाकघरांसह स्वयंपूर्ण जगणाऱ्या कुटुंबांना आता स्वतंत्र ओळख मिळणार आहे. विद्यमान घराच्या विशिष्ट भागासाठी घर क्रमांक फोड करण्यासाठी स्पष्ट प्रक्रिया आखून दिली आहे. हा निर्णय विशेषतः अशा कुटुंबांसाठी दिलासा देणारा आहे, जे एकाच घरात विभक्त स्वरूपात राहतात. आणि स्वतंत्र पाणी व वीजजोडणी मिळवू इच्छितात. गावपातळीवर असणाऱ्या लहानसहान अडचणींना दूर करत, स्वयंपूर्ण गोव्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून या निर्णयाचे पाहिले पाहिजे.

१५ दिवसांत निर्णय

अर्जदाराने मूळ घरातील स्वतःच्या वापरातील भागाचा स्पष्ट स्केच सादर करावा लागेल. गाव पंचायतीने अर्ज प्राप्त झाल्यावर १५ दिवसांच्या आत निर्णय द्यायचा आहे. यामध्ये आवश्यक असल्यास पाणी व वीज जोडणीसाठी स्वतंत्र ना‌ हरकत दाखला दिला जाईल.

कायदेशीर बाबी स्पष्ट

हा क्रमांक केवळ ओळख व कर भरण्यापुरता असेल, मालकी हक्क सिद्ध करणार नाही. यामुळे कोणालाही मालमत्तेचा हक्क मिळणार नाही, हा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे. हा उपाय फक्त कररचना आणि नागरी सुविधा सोप्या करण्यासाठी आहे.

यात नवे काय?

यापूर्वी काही पंचायती आवश्यक कागदपत्रांची मागणी न करता फोड क्रमांक देत असत, तर काही पंचायती त्याला विरोध करत होत्या. त्यामुळे नागरिकांना पाणी, वीजजोडणीसारख्या मूलभूत सुविधा मिळण्यात अडथळे येत होते.

फॉर्म ‘अ’विषयी महत्त्वाची माहिती

फॉर्म ‘अ’मध्ये अर्जदाराचे नाव, मूळ घराचा (House) तपशील, वापरात असलेल्या भागाचा स्केच, कराच्या नोंदी व त्यासंदर्भातील पुरावे भरावयाचे आहेत. पंचायतीने ठरावानुसार क्रमांक देऊन आवश्यक कागदपत्रांसह कार्यवाही करायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT