Goa Politics: चिराग नायकांना प्रवेश देऊन काँग्रेसने मारलेला तीर, दिगंबर कामतांना लागणार की नाही?

Margao Constituency Election: युवा उद्योजक चिराग नायक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मडगावचे राजकीय वातावरण ढवळून गेले असून चर्चेला ऊत यायला लागला आहे.
Digambar Kamat
Digambar Kamat Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: युवा उद्योजक चिराग नायक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मडगावचे राजकीय वातावरण ढवळून गेले असून चर्चेला ऊत यायला लागला आहे. यात पहिला मुद्दा आहे, तो दिगंबर कामत यांच्या भाजप प्रवेशाचा. याबाबत त्यांना आगामी निवडणुकीत काय फायदा होईल?

लोकसभा निवडणुकीत भाजपला मडगावातून अगदी नगण्य आघाडी मिळाली होती. दिगंबर कामतानी भाजपला मडगावातून १०००० मतांची आघाडी मिळवून देणार अशी घोषणा केली होती.

पण प्रत्यक्षात भाजपाला फक्त अकराशे मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले होते. मोती डोंगर हा कामतांचा बालेकिल्ला मानला जातो. हा भाग दर निवडणुकीत कामतांच्या मागे राहिला आहे. पण लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळे चित्र दिसून आले.

या भागात अल्पसंख्याक लोक बरेच प्रमाणात राहतात. हे लोक बहुतांशी काँग्रेसचे मतदार म्हणून गणले जात असल्यामुळे ते भाजपला मतदान करण्यास तयार नसतात. त्याचाही परिणाम लोकसभा निवडणुकीत झाला असावा, असे बोलले जात आहे.

कामत हे २००५ सालापासून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येत असल्यामुळे त्यांना मिळणारी मते ही काँग्रेसची की त्यांची वैयक्तिक यावरही चर्चा सुरू आहे. एक मात्र खरे चिराग नायकांना काँग्रेस प्रवेश देऊन काँग्रेसने एक मोठा तीर मारला आहे. हा तीर दिगंबर कामताना लागतो की नाही, हा पुढचा प्रश्न असला तरी या प्रवेशामुळे काँग्रेसने परत एकदा मडगावात आपले अस्तित्व निर्माण केले आहे, एवढे नक्की.

Digambar Kamat
Goa Politics: नवखेपणाचा फायदा 'चिराग' यांना होणार? की 'दिगंबर' पुन्‍हा जिंकून येणार? मडगावात राजकीय चर्चांना ऊत

भविष्यात मतदारसंघात काँग्रेस भाजपवर पलटवार करू शकतात, असे चित्र निर्माण करण्यात सध्या तरी ते यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास चिरागांची सुद्धा बऱ्यापैकी क्रेज असल्याचे दिसून येते. अर्थात ही क्रेज त्यांना निवडणूक जिंकू देण्यास हातभार लावेल की काय? हे सांगणे सध्या तरी कठीण असले तरी त्यांनी मडगावच्या राजकीय पटलावर निश्चितपणे मोहोळ उठविली आहे.

चिराग हे एकेकाळी दिगंबरांचे कार्यकर्ते असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो. त्यात परत दिगंबर २०२७ च्या निवडणुकीपर्यंत ७३ वर्षाचे होणार असल्यामुळे हा मुद्दाही त्यांच्या विरोधात जाऊ शकतो, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. यामुळेच मडगावात बदलाची हवा, असा नारा लावण्याची तयारी काही घटकांनी आतापासून सुरू केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Digambar Kamat
Govind Gaude: मंत्री गावडेंचा विषय पोचला दिल्‍लीपर्यंत! उचलबांगडीचे संकेत; CM सावंतांनी केले सुतोवाच

नवीन समीकरण

हा फॅक्टर, वयाचा फॅक्टर, तसेच फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी लोकसभा निवडणुकीत दिगंबर कामताविरुद्ध केलेल्या प्रचाराची या निवडणुकीत पुनरावृत्ती केल्यास त्यातून निर्माण होऊ शकणारे एक नवीन समीकरण याला माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत कसे तोंड देतात, यावरच त्यांचे यशापयश अवलंबून असणार आहे, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com