Goa Politics: गोविंद गावडेंना मंत्रिपदावरुन हटविल्यास संपूर्ण गोव्यात वणवा पेटेल! सोशल मिडियावर गावडेंच्या समर्थनात Campaign

Goa Minister Govind Gaude: मंत्री गोविंद गावडेंच्या विरोधात वातावरण निर्माण होत असताना आता त्यांच्या समर्थनात सोशल मिडियावर कॅम्पेन सुरु झाले आहे.
Govind Gaude Controversy
Minister Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Govind Gaude Controversy

पणजी: कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्यांची भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर त्यांची गच्छंती जवळपास निश्चित मानली जात आहे. आदिवासी कल्याण विभाग आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानाची प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री सावंत यांनी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला आहे. गावडेंच्या विरोधात वातावरण निर्माण होत असताना आता त्यांच्या समर्थनात सोशल मिडियावर कॅम्पेन सुरु झाले आहे.

गोविंद गावडे यांच्याकडून वारंवार होणाऱ्या बेताल वक्तव्याची पक्षाने गंभीर दखल घेतली असून, दिल्लीत देखील याची कल्पना देण्यात आली आहे. गावडे यांच्यावर पक्षाच्या वतीने योग्य कारवाई करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी देखील याला दुजोरा दिल्याने गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे मात्र गावडेंच्या समर्थनात सोशल मिडियावर कॅम्पेन सुरु झाले आहे. गोविंद गावडेंना मंत्रिपदावरुन हटविल्यास संपूर्ण गोव्यात वणवा पेटेल! असा इशाराचा या कॅम्पेनमधून देण्यात आला आहे.

Govind Gaude Controversy
Govind Gaude: मुख्यमंत्री कारवाई होणार म्हणताच मंत्री गोविंद गावडेंना आठवली मैत्री; माध्यमांवर फोडले खापर

काय आहे मेसेज?

"कलासक्त मनाचे कला व संस्कृती मंत्री, क्रीडा खात्याचे मंत्री तथा बहुजन समाजाचा बुलंद आवाज असलेले गोविंद गावडे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करू नये. जर गोविंद गावडे यांना मंत्री पदावरुन काढल्यास याचा वणवा संपूर्ण गोव्यात पेटेल ! गोविंद गावडे हे फक्त प्रियोळ मतदारसंघापूर्ती मर्यादित नाहीत..."

Govind Gaude Controversy
Goa Literacy: अभिमानास्पद आणि ऐतिहासिक! गोवा राज्य 100 टक्के साक्षर; मुख्यमंत्री सावंतांची माहिती

दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांनी आज (मंगळवारी) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला. मी मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. मुख्यमंत्री माझे मित्र आहेत, असे गावडे म्हणाले.

मात्र, मंत्री गावडे यांच्यावर कारवाई होणार, असे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढे काय होते, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com