Shivanand Alias Nanda Gaitonde passed away in Pune Dainik Gomantak
गोवा

गोवा मुक्ती चळवळीतील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नंदा गायतोंडे कालवश

मूळ पाळोळे काणकोण येथील शिवानंद उर्फ नंदा गायतोंडे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक पीटर आल्वारिस यांचे सहकारी शिवानंद उर्फ नंदा गायतोंडे (95) यांचे काल गुरुवारी रात्री पुण्यात निधन झाले. गोवा मुक्ती चळवळीत स्वतःला झोकून देऊन कार्य केलेले मूळ पाळोले काणकोण येथील नंदा गायतोंडे यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मागचा महिनाभर त्यांच्यावर पुण्यातील जोशी इस्पितळात उपचार चालू होते मात्र काल त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे त्यांची पत्नी प्रफुल्ला आहेत. प्रसिध्द स्वातंत्र्य सैनिक डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचे ते भाऊ होते. व्यवसायानिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले होते.

आपल्या बंधूंच्या प्रेरणेतून गोवा मुक्ती चळवळीत झोकून दिलेले नंदा गायतोंडे हे कुशल संघटक असल्याने गोवा नॅशनल काँग्रेस या स्वातंत्र्य सैनिकांच्या संघटनेने त्यांच्यावर काणकोण, सासष्टी व मुरगाव या तीन तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यांचे हे कार्य चालू असतानाच 19 जून 1954 या दिवशी त्यांना अटक झाली. पोर्तुगीज सैनिकी न्यायालयाने त्यांना त्यासाठी आठ वर्षांची सक्तमजुरी आणि 15 वर्षे नागरी हक्कावर निर्बंध आणण्याची शिक्षा ठोठावली होती. त्यांना आग्वाद तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिथेच त्यांनी अर्थशास्त्र व तत्वज्ञान या विषयाचा अभ्यास केला.

1959 साली त्यांना मुक्त करण्यात आले त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. ते जरी व्यवसायानिमित्ताने पुण्यात स्थाईक झाले तरी गोव्याशी त्यांनी नाते तोडले नव्हते. अजित पैंगिणकर, कमलाकर म्हाळशी यांना साथीला घेऊन त्यांनी काणकोणात बंद पडलेला पुंडलिक गायतोंडे दिवस पुन्हा सुरू केला होता. या दिनानिमित्त ते विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार यांना घेऊन एखाद्या ज्वलंत विषयावर व्याख्यान ठेऊन त्यावर चर्चा घडवून आणायचे अशी माहिती पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT