डिझेल न भरता बस नेणं कदंबचालकाला पडलं महागात

अर्ध्या रस्त्यात डिझेल अभावी बस बंद पडल्याने चालकाला कारणे दाखवा नोटीस
Kadamba Bus Broke Down in Goa
Kadamba Bus Broke Down in GoaDainik Gomantak

पणजी : फोंड्याजवळच एका मार्गावर कदंब बस बंद पडल्याने चालकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. डिझेल न भरताच कदंब बसगाडी घेऊन जाणं चालकाला चांगलंच महागात पडल्याचं समोर आलं आहे. डिझेलअभावी बस अर्ध्या वाटेत बंद पडल्याने कदंब महामंडळाच्या अध्यक्षांकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. चालकाला बेजबाबदार वर्तनासाठी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

Kadamba Bus Broke Down in Goa
काणकोणात दहा कोटींच्या खर्चानंतरही पाण्याची नासाडी

फोंड्याजवळ असलेल्या आर्ल- केरी सावईवेरे मार्गावरील कदंब बसगाडी डिझेल अभावी बंद पडली होती. या घटनेमुळे प्रवाशांना भररस्त्यात नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र याची कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास नाईक तुयेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. कदंब बसच्या चालकाला महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. डिझेल न भरताच बसगाडी घेऊन जाण्याच्या बेजबाबदार कृतीबाबत चालकावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

Kadamba Bus Broke Down in Goa
‘नेत्रावळी’कडे पर्यटकांनी फिरवली पाठ

नवीन सरकार स्थापन झाल्यापासून प्रशासनाचं काम गतिमान झाल्याचं चित्र आहे. राज्य सरकारच्या खात्यांचा सामान्य जनतेला फायदा व्हावा या उद्देशाने प्रत्येक खात्याने व्हिजन डॉक्युमेंट तयार करावेत, असे निर्देश संबंधित मंत्र्यांना दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे लक्ष पूर्ण करण्यासाठी 'सरकार तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम पुन्हा सुरु करत असल्याचे ते म्हणाले. भाजप सहप्रभारी सी.टी. रवी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिली. गेल्या महिन्याभरात सर्वच खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक कसा होईल याबाबत पावलं उचलल्याचं दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com