Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीतील शाळांना 'गळती', प्रशासनाचा धिम्यागतीने कारभार सुरू

गळतीची शक्यता ः मॉन्सूनपूर्व दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News डिचोलीतील काही शाळांनी अद्यापही मॉन्सूनपूर्व कामे करण्याकडे लक्ष दिले नसल्याचे आढळून येत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष जवळ आले असून, शाळा इमारतींची पावसाळापूर्व देखभाल आदी प्रतिबंधात्मक कामे वेळीच केली नाहीत, तर यंदाही पावसाळ्यात काही शाळांना `गळती`ची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे चार-पाच वर्षांत मिळून डिचोलीतील विठ्ठलापूर, केंद्रशाळा-डिचोली, देसाईनगर-साखळी, मुळगाव, अडवलपाल, उसप लामगाव, मये आदी भागातील प्राथमिक शाळांसाठी सुसज्ज इमारती बांधल्या आहेत.

तर काही शाळा इमारतींच्या छपरांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तरीही काही ग्रामीण भागातील शाळा इमारती अजूनही पूर्वीप्रमाणे आहेत, त्याच अवस्थेत आहेत.

या शाळांनी पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक कामे करणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पालकांनी आश्चर्य व्यक्त केले.

कौले फुटलेल्या अवस्थेत

डिचोलीतील काही शाळांचे छ्प्पर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे आढळून येत आहे. काही इमारतींच्या छपरांवरील कौलेही फुटलेली आहेत.

शाळा इमारतीची फुटलेली कौले बदलणे आदी देखभालीची कामे पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक आहे. मात्र, ही देखभालीची कामे करण्याकडे अजूनही दुर्लक्ष झालेले आहे.

जबाबदारी कोणाची?

शाळांची सध्याची स्थिती पाहता, ही जबाबदारी कोणाची? असा प्रश्न पडत आहे. शाळांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील बहूतेक शाळांनी प्रवेश प्रक्रियाही सुरू केली आहे. सध्या प्राथमिक शाळा बंद आहेत.

शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत शाळा बंद असणार आहेत. तोपर्यंत पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यापूर्वी शाळांची दुरुस्ती झाली नाही, तर शाळांना गळती लागण्याची शक्यता आहे. यापूर्वीही पावसाळ्यात काही शाळांनी हा वाईट अनुभव आलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT