ST Political Reservation: 'आरक्षणाची शेवटची आशाही मावळली'; प्रकाश वेळीप यांची खंत, अन्यायाविरोधात लोकच निर्णय घेणार

Goa ST Reservation 2027 Elections: सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळून न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा होती.
Goa ST Reservation 2027 Elections
ST Political ReservationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळून न्याय मिळेल, अशी आम्हाला आशा होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशाने त्यावर पाणी फेरले गेले आहे. आमची शेवटची आशाही पूर्ण झालेली नाही, अशा परिस्थितीत २०२७ च्या निवडणुकीत गोव्यातील एसटींना आरक्षण मिळणे हे आता जवळपास अशक्य आहे असे वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया ‘उटा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ एसटी नेते प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केली.

वेळीप म्हणाले, की मागच्या चार निवडणुकांमध्ये आम्हाला आमच्या संवैधानिक अधिकारांपासून वंचित केले. आता आरक्षणाचा घास तोंडाकडे आला होता. तोही हिरावून घेतला आहे. यामुळे गोव्यातील एसटी समाजात प्रचंड चीड आहे. पुढे काय करायचे ते गोव्यातील असंख्य एसटी बांधव निर्णय घेतील, एवढेच मला सांगायचे आहे. वेळीप यांनी पुढे सांगितले, झालेल्या अन्यायाविरोधात आता एसटी समाजाने पेटून उठले पाहिजे.

Goa ST Reservation 2027 Elections
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

हा वेळ फक्त भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याचा नव्हे किंवा रॅली काढून मौजमजा करण्याचा नव्हे, हे आता एसटी युवकांनी जाणण्याची गरज आहे. हा फक्त आरक्षणाचा विषय नव्हे, तर एसटी समाजाच्या जीवन-मरणाचा प्रश्‍‍न आहे, याची जाणीव युवकांनी ठेवणे आवश्यक आहे.

आता निवडणुकीच्या वेळी तुमच्या दारात जे मते मागायला येतील, त्यांना आमच्या एसटी आरक्षणाचे काय झाले, हा प्रश्‍‍न आमच्या महिलांनी आणि युवकांनी विचारावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Goa ST Reservation 2027 Elections
Goa Politics: राणे-सावंत एकत्र; दोनापावल्यातील बैठकीत शिवप्रकाशही सहभागी, भोजनावर चर्चा

... तर कवळेकर, फळदेसाई ‘सेफ’

‘एसटी’ राजकीय आरक्षणाची आशा मावळल्यात जमा असल्याने काही मतदारसंघांतील प्रस्थापित नेत्यांना दिलासा ठरणार आहे. त्यात केपे मतदारसंघात बाबू कवळेकर, सांगे मतदारसंघात मंत्री सुभाष फळदेसाई यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येतो. हे मतदारसंघ आरक्षित झाले तर त्यांना अन्य मतदारसंघ शोधावे लागतील. तथापि, सद्यस्थिती पाहता तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राहिलेला अवधी पाहता कवळेकर, फळदेसाई यांना दिलासा वाटू शकतो. तसेच नुवे मतदारसंघातीलही काही नेते आरक्षण लागते की टळते, याकडे डोळे लावून बसले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.