Vasco Mock Drill: वास्कोत अचानक अग्निशमन बंब, रुग्णवाहिकांची धावपळ; न्यू मॉडर्न मार्केटमध्ये मॉक ड्रिल

New Modern Market Mock Drill: वास्को येथील न्यू मॉडर्न मार्केट परिसरात बुधवारी सायंकाळी आयोजित केलेली मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पाडली.
New Modern Market Mock Drill
Vasco Mock DrillDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: येथील न्यू मॉडर्न मार्केट परिसरात बुधवारी सायंकाळी आयोजित केलेली मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पाडली. मात्र, अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका, पोलिस वगैरेंची धावपळ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु ही मॉक ड्रिल असल्याचे समजताच काहीजण तेथेच थांबून प्रात्यक्षिके पाहू लागले.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी (ता. २५) सायंकाळी न्यू मॉडर्न मार्केट परिसरात नागरी संरक्षण हवाई हल्ला व ‘ब्लॅक आऊट’ या विषयावर मॉक ड्रिलचे आयोजन केले होते. आपत्कालीन प्रतिसाद व इशारा प्रणालीची चाचणी घेणे यामागील उद्देश होता. न्यू मॉडर्न मार्केट परिसरात सायंकाळी साडेपाच ते पावणे सात या वेळेत मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी अग्निशमन दल, एनडीआरएफच्या जवानांसह पोलिस, होमगार्ड सहभागी झाले होते.

New Modern Market Mock Drill
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

अग्निशमन दल, एनडीआरएफच्या जवानांनी मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक दाखविताना जखमींना स्टेचरवरून आणले. त्यानंतर त्या जखमींना रुग्णवाहिकेतून इस्पितळात पाठविले. या मॉकड्रिल प्रसंगी न्यू मॉडर्न मार्केटासमोरच्या रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. यावेळी वाहतूक पोलिस, पोलिस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मॉकड्रिलमध्ये मुरगावचे मामलेदार कार्यालयाचे कर्मचारीही सहभागी झाले होते. अग्निशमन दलाची तीन वाहने तेथे तैनात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.