Whatsapp Fraud Goa Dainik Gomantak
गोवा

Fraud Alert: सावधान! फसवणूक करणाऱ्यांकडून नेत्यांच्या नावांचा गैरवापर; व्हॉट्सॲपला बनवलं हत्यार

Whatsapp Fraud Goa: राज्यात राजकीय नेत्यांच्या नावांचा गैरवापर करुन लोकांना व्हॉट्सॲपवर टार्गेट करण्याचे प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

WhatsApp Fraud Alert

पणजी: राज्यात आज (दि. २४ ऑक्टोबर) एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. काही राजकीय नेत्यांच्या नावांचा गैरवापर करुन लोकांना व्हॉट्सॲपवर टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

कृषीमंत्री रवी नाईक, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो, प्रेमेंद्र शेट यांच्यानंतर आता अज्ञात माणसांकडून आमदार जीत आरोलकर आणि निलेश काब्राल यांची नावे वापरुन लोकांची फसवणूक सुरु केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, तसेच या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीये.

दाबोळीचे आमदार आणि वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी एक नोटीस जारी करत एक अज्ञात व्यक्ती त्यांचे नाव व फोटो वापरून अमेझॉन-पे इ-गिफ्टकार्डच्या नावाखाली पैसे मागत असल्याची माहिती दिली. या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा शोध सुरु असल्याचंही गुदिन्हो म्हणालेत, यासोबतच त्यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहत अशा फसव्या संदेशांना बळी न पडण्याची विनंती केलीये.

राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक आणि कुडचड्याचे आमदार निलेश काब्राल यांनी देखील त्यांच्या नावे काही व्हॉट्सॲप संदेश फिरत असल्याची माहिती दिली. हे अज्ञात व्यक्ती राजकीय नेत्यांचे नाव व फोटो वापरून नागरिकांना संदेश पाठवत आहेत. निलेश काब्राल यांनी असे संदेश आल्यास त्वरित याची माहिती देण्याची विनंती केलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

सुरतला निघाली, मडगावात पोहोचली; 13 वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT