Goa Crime: स्वतःच्या मुलीसोबत भांडण केल्‍याच्‍या रागातून पालकांची शाळकरी मुलीला मारहाण

Goa News: शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणावरून अकरा वर्षीय मुलीला धमकी देण्यासह तिला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक
Goa News: शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणावरून अकरा वर्षीय मुलीला धमकी देण्यासह तिला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा, ता. २३ (प्रतिनिधी) : शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणावरून अकरा वर्षीय मुलीला धमकी देण्यासह तिला मारहाण केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित आरोपी गौतम संजय वर्मा (३६, रा. कळंगुट व मूळ उत्तर प्रदेश) यास अटक केली; तर त्याच्या संशयित पत्नीच्या नावे नोटीस बजावली आहे.

ही घटना बुधवारी (दि. २३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ७:३०च्या सुमारास आगरवाडा-कळंगुट जंक्शनवर घडली. याप्रकरणी हडफडे येथील पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली.

पीडित मुलगी व संशयिताची मुलगी या दोघीही म्हापशातील एकाच शाळेत सहावीच्या वर्गात शिकतात. त्या एकाच टेम्पो ट्रॅव्हल्‍समधून शाळेत ये-जा करतात. या दोघींमध्ये शाळेत भांडण झाले होते. संशयितांच्या मुलीने पालकांना ही घटना सांगितली आणि त्यांनतर सकाळी आगरवाडा-जंक्शनवर मुलीला शाळेत सोडण्यासाठी आलेले संशयित पालक गाडीत चढले व त्यांनी पीडित मुलीला शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच संशयित शिखा वर्मा हिने पीडितेच्या कानशिलात मारली असता, ती किरकोळ जखमी झाली.

Goa News: शाळकरी मुलींमध्ये झालेल्या भांडणावरून अकरा वर्षीय मुलीला धमकी देण्यासह तिला मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक
Panaji Court: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीने पीडितेशी बांधली लग्नगाठ; कोर्टाने दिला 'हा' निर्णय

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम ३५२, ११५(२), ३(५) व गोवा बाल कायदा कलम ८(२) अन्वये गुन्हा दाखल केलाय. संशयित आरोपी गौतम वर्मा यास अटक करण्यात आली असून संशयित महिलेविरुद्ध नोटीस जारी केली गेली आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्नेहल मळीक करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com