Ravi Naik: युवा पिढीने योगाचा पुरस्कार करावा! रवी नाईक यांचे मत

Ravi Naik: फोंड्यातील कुडतरकरनगरी येथील फ्लॅट व प्लॉट ओनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात रवी नाईक बोलत होते
Ravi Naik: फोंड्यातील कुडतरकरनगरी येथील फ्लॅट व प्लॉट ओनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात रवी नाईक बोलत होते
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न होत असल्याने योगाचा पुरस्कार आजच्या युवा पिढीने करावा, असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले. फोंड्यातील कुडतरकरनगरी येथील फ्लॅट व प्लॉट ओनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात रवी नाईक बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, नगरसेवक रुपक देसाई, वीरेंद्र ढवळीकर, योग शिक्षक दिनेश नाईक, असोसिएशनचे श्रीकांत कामत, पत्रकार नरेंद्र तारी तसेच अन्य योग शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.

रवी नाईक म्हणाले की, आज बदलत्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम शरीरावर होत आहे. नवनवीन रोगराई फैलावत आहे, शरीर तंदुरुस्त आणि सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगाचा उपयोग होत असल्याने व्यायामासोबतच योगाचा पुरस्कार नागरिकांनी करावा आणि समृद्ध देशाच्या उभारणीत मदत करावी.

येथील नागरिकांसाठी रूपक देसाई व इतरांनी योग प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. नृत्यातून योगाचा पुरस्कार करताना व्यायामाचा पुरस्कार येथील महिला वर्गाने खूप छानरीत्या केल्याने रवी नाईक यांनी त्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

नगराध्यक्ष आनंद नाईक म्हणाले की, योगाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. नृत्यातून योग प्रशिक्षण खूप छान होत असल्याने आपल्या प्रभागातही असे प्रशिक्षण घेण्यास आपण उत्सुक आहोत.

स्वागत व प्रास्ताविक दिनेश नाईक यांनी केले. सूत्रसंचालन दयानंद कविटकर यांनी केले. श्रीकांत कामत यांनी आभार मानले. यावेळी योग शिक्षक श्रेया सिंघल यांचा रवी नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली.

Ravi Naik: फोंड्यातील कुडतरकरनगरी येथील फ्लॅट व प्लॉट ओनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात रवी नाईक बोलत होते
Ravi Naik: प्रत्येकाने देशातील जातिधर्मातील वाद थांबवावा; कृषिमंत्री नाईक

बदलत्या जीवनशैलीत योग हवा!

नगरसेवक रितेश नाईक, रुपक देसाई व वीरेंद्र ढवळीकर यांनी योगाचा पुरस्कार हा शरीरासाठी उपयुक्त असून आजच्या बदलत्या जीवनशैलीला हा एक पूरक उपाय असल्याचे नमूद केले. रुपक देसाई यांनी कुडतरकरनगरीत विकासाची कामे हाती घेतली असल्याचे नमूद करून कृषिमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ती पूर्णत्वास नेली जातील, अशी ग्वाही दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com