Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली

Goa Airport Dabolim: वळवण्यात आलेल्या विमानांपैकी एक विस्तारा आणि चार इंडिगोची विमाने होती.
Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली
FlightDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका विमान वाहतुकीला बसला. खराब हवामानामुळे दक्षिणेतील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पाच व्यावसायिक उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली.

मंगळवारी संध्याकाळी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

खराब हवामानामुळे, विमानतळ प्राधिकरणाला हैदराबाद आणि बेंगळुरूमधील विमानतळांवर उड्डाणे वळवावी लागली, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्याने दिली.

मंगळवारी दाबोळीवरील दोन उड्डाणे हैदराबादला तर तीन बेंगळुरूला वळवण्यात आली. सकाळी 12.10 वाजता हवामान साफ ​​झाले आणि नंतर विमान सेवा पूर्ववत झाली.

अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, वळवण्यात आलेल्या विमानांपैकी एक विस्तारा आणि चार इंडिगोची विमाने होती.

Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली
St Francis Xavier Controversy : गोव्यातील DNA चाचणीचा वाद पोहोचला महाराष्ट्रात; मुंबईतील नागरिकांकडून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार

दोन दिवसांपासून पावसाची हजेरी

गोव्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली तर काही ठिकाणी वाहतूक मंदावली.

गोवा हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, वादळी वाऱ्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com