STP plant installation in Goa Dainik Gomantak
गोवा

Sanquelim: साखळीत मोठ्या इमारतींना STP Plant बंधनकारक! पालिका बैठकीत ठराव; 'सांडपाणी' प्रश्नावर उचलणार कडक पावले

Sanquelim STP Plant: साखळी नगरपालिका क्षेत्रात अनेक इमारतींचे सांडपाणी उघड्यावर किंवा गटारात सोडले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

Sameer Panditrao

साखळी: साखळी नगरपालिका क्षेत्रात अनेक इमारतींचे सांडपाणी उघड्यावर किंवा गटारात सोडले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारी गलिच्छता व पसरणारी दुर्गंधी यावर पालिका बैठकीत चर्चा झाली. यापुढे मोठ्या रहिवासी इमारतींना ‘एसटीपी प्लांट’ बंधनकारक करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव साखळी या बैठकीत घेण्यात आला आहे.

तसेच उघड्यावर सांडपाणी सोडणाऱ्या काही घरांविरुद्ध अनेक तक्रारी आहेत, अशांवर कडक कारवाई केली जाणार असून प्रसंगी त्यांची वीज व पाणी कनेक्शनही तोडण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सिद्धी प्रभू यांनी पालिका बैठकीनंतर दिली.

बैठकीस उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, ब्रह्मानंद देसाई, रियाज खान, प्रवीण ब्लेगन, रश्मी देसाई, दीपा जन्मी, अंजना कामत, भीमनाथ खोर्जुवेकर, पालिका अभियंता व इतरांची उपस्थिती होती.

... कडक कारवाई!

नगरपालिका क्षेत्रात जर कोणी बेकायदेशीर बांधकाम किंवा इतर अवैध काम करीत असल्याचे आढळल्यास त्यावर पालिका कठोर कारवाई करणार. कोणी बेकायदेशीर कामे करीत असल्याचे आढळल्यास लोकांनीही नगरपालिकेकडे रितसर तक्रार करावी, असे आवाहन नगराध्यक्षा सिध्दी प्रभू यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा झटका; 13 ऑक्टोबरपर्यंत 2 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

SCROLL FOR NEXT