Sanquelim: साखळी पालिकेचा अभिनव निर्णय! वापरणार विहिरींचे पाणी; बिलाचे 60 हजार रुपये वाचणार

Sanquelim Water Supply: विहिरीतील पाणी पंपिंग करून थेट बाजारातील इमारतीला दिले जाणार आहे. तत्पूर्वी या पाण्याची तपासणी केली जाणार आहे.
Sanquelim Water Supply
Sanquelim Water SupplyDainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Water Supply

साखळी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार स्वयंपूर्ण साखळी पालिका बनविण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी एक पाऊल टाकले असून साखळी बाजार परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून कचराकुंडी बनून राहिलेल्या विहिरींची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या विहिरींच्या पाण्याची चाचणी करून ते पाणी पिण्यायोग्य असल्यास पालिका इमारत व बाजारातील मार्केट प्रकल्पाला पुरविले जाणार आहे. त्यामुळे दरमहा पालिकेचे ५० ते ६० हजार रुपये वाचणार, अशी माहिती नगराध्यक्षांनी दिली.

बाजारातील विनय पांगम यांच्या दुकानासमोरील विहिरीची साफसफाई करण्यात आली आहे. या विहिरीला बारामाही पाणी असते. पूर्वी याच विहिरीचे पाणी बाजारातील लोकांकडून वापरले जायचे. परंतु नळ संस्कृतीमुळे या विहिरींकडे लोकांनी दुर्लक्ष केले. परंतु साफसफाई केल्यास बाजारातील लोकांसाठी या विहिरी फायदेशीर ठरू शकतात, या दृष्टीने विचार करून नगराध्यक्षा प्रभू व उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांनी विहिरींची साफसफाई हाती घेतली आहे.

पाण्याची तपासणी होणार

या विहिरीतील पाणी पंपिंग करून थेट बाजारातील इमारतीला दिले जाणार आहे. तत्पूर्वी या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत जर हे पाणी पिण्यायोग्य आढळले तर स्वच्छतागृहांसह पिण्यासाठीही याच पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच पालिका इमारतीच्या बाहेर असलेल्या विहिरीची साफसफाई करून या विहिरीतील पाणी नगरपालिका इमारतीला पुरविले जाणार आहे, असे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू व उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांनी सांगितले.

Sanquelim Water Supply
Water Supply Scheme: पाणीप्रश्नावर राज्य 'गंभीर'! पुरवठा योजनेचा मास्टर प्लॅन तयार; अनेक गावांची तहान भागणार

लोकांनी पुढाकार घ्यावा

या दोन्ही विहिरींचे पाणी पालिका इमारत व पालिका मार्केटमध्ये वापरायला सुरवात केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची पाणी कनेक्शने बंद केली जाणार आहेत. त्यामुळे पालिकेचा दरमहिना ५० ते ६० हजारांच्या महसुलाची बचत होणार,असे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी सांगितले. पालिका क्षेत्रातील इतर विहिरीही लोकांनी स्वच्छ करून त्याचे पाणी वापरावे. जेणेकरून विहिरी स्वच्छ राहतील व काही प्रमाणात पैशांचीही बचत होईल, असे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू म्हणाल्या.

Sanquelim Water Supply
Sanquelim Accident: ‘स्पीडब्रेकर’मुळे गेले चालकाचे नियंत्रण! मोटरसायकलवरून पडून महिला जखमी, निष्काळजीपणा भोवला

दोन ट्रक कचरा हटविला

भर बाजारात असलेल्या या विहिरीला कचराकुंडाचे स्वरूप प्राप्त झाले होते. साफसफाई करताना या विहिरीतून प्लास्टिक व इतर कचरा मिळून दोन ट्रक भरून कचरा हटवण्यात आला. ही विहीर साफ करण्यासाठी तीन दिवस लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com